OBC Reservation : ओबीसींचे 27 टक्के आरक्षण रद्द, काँग्रेस उचणार मोठे पाऊल, जीतू पटवारींनी प्लॅन सांगितला

OBC Reservation Court Verdict : मध्य प्रदेश हाय कोर्टाने मोठा निर्णय देत 2019 मध्ये दिलेले 27 टक्के आरक्षण रद्द केले आहे. पुन्हा 14 टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.
OBC leader Vijay Bochare Death
OBC leader Vijay Bochare from Akola allegedly took his life at a bus stop, leaving a note demanding caste census and protection of OBC reservation.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

MP Reservation : मध्य प्रदेशामध्ये 2019 मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ओबीसींची राज्यातील आरक्षणाची मर्यादा वाढवून 27 टक्के केली होती. 14 टक्क्याहून हे आरक्षण 27 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी मध्य प्रदेशाच्या हाय कोर्टाने हे आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा आता ओबीसींना 14 टक्केच आरक्षण मिळणार आहे.

कमलनाथ यांच्या निर्णयामुळे राज्यातील आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त झाली होती. कोर्टाने आपले निरीक्षण नोंदवताना म्हटले की, आरक्षणाची मर्यादा ओलांडणारी कोणतीही अपवादा‍त्मक परिस्थिती आढळली नाही.

दरम्यान, आरक्षणामुळे 13 टक्के पदे राज्य सरकारकडून रोखून ठेवण्यात आली होती. ती खुला वर्गातून भरण्याचे निर्देश देखील कोर्टाने दिले आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात काँग्रेस सुप्रीम कोर्टात जाणार आहे.

मध्य प्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी म्हणाले की, हायकोर्टाने दिलेल्या निर्णायाविरोधात काँग्रेस सुप्रीम कोर्टात जाणार आहे.

OBC leader Vijay Bochare Death
Congress MP case : दहा विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, प्राध्यापक असलेल्या काँग्रेस खासदाराची हकालपट्टी

ओबीसी संघटना आक्रमक

या निर्णयामुळे ओबीसी संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. राज्य सरकारने कोर्टात नीट बाजू मांडली नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.ओबीसी संघटना देखील स्वतंत्रपणे सुप्रीम कोर्टात अपील करणार आहेत.

OBC leader Vijay Bochare Death
Congress News: 'ईव्हीएम'वर शंका, बॅलेट पेपरवर निवडणुका, त्यातही काँग्रेसला पराभवाचा मोठा धक्का,भाजपचा दणदणीत विजय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com