Operation Sindoor : परदेशात 'ऑपरेशन सिंदूर' मागील भूमिका सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे मांडणार; पाकवर डिप्लोमॅटीक स्ट्राईक!

Supriya Sule Shrikant shinde : या शिष्टमंडळांचा दौरा या महिन्याच्या शेवटी होणार असून हे खासदार जगातील काही प्रमुख देशांना, विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) च्या सदस्य देशांना भेट देतील.
MPs Supriya Sule and Shrikant Shinde to lead India's voice abroad under Operation Sindoor – a united front against global terrorism."
MPs Supriya Sule and Shrikant Shinde to lead India's voice abroad under Operation Sindoor – a united front against global terrorism."sarkarnama
Published on
Updated on

Operation Sindoor News : भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादा विरोधातील भूमिका जगाला सांगण्यासाठी भारताच्या खासदारांचे शिष्टमंडळ परदेशी दौऱ्यावर जाणार आहेत. तब्बस सात शिष्टमंडळ परदेशात जाणार आहेत. त्यातील पहिल्या शिष्टमंडळातील नावांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत भाजपचे दोन, काँग्रेस, डीएमके, जेडीयू, राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे आणि एकनाथ शिंदें यांच्या शिवसेना यांचा प्रत्येकी एक खासदार आहेत.

या शिष्टमंडळांचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे आणि शिवसेनेकडून श्रीकांत एकनाथ शिंदे हे करणार आहेत. तर, भाजपकडून रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, काँग्रेसकडून शशी थरूर, जेडीयूकडून संजय कुमार झा, डीएमकेकडून कनिमोळी करुणानिधी या करतील.

MPs Supriya Sule and Shrikant Shinde to lead India's voice abroad under Operation Sindoor – a united front against global terrorism."
PCMC : पिंपरी चिंचवडमधील 'त्या' 29 इमारतींचं बांधकाम पाडायला सुरूवात, कोर्टाच्या आदेशाची पालिकेकडून तात्काळ अंमलबजावणी

या शिष्टमंडळांचा दौरा या महिन्याच्या शेवटी होणार असून हे खासदार जगातील काही प्रमुख देशांना, विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) च्या सदस्य देशांना भेट देतील. तेथे ऑपरेशन सिंदूर आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका जगासमोर मांडण्यात येणार आहे. या शिष्टमंडळांकडून हे स्पष्ट करण्यात येईल की, भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई का आणि कशी केली.

शिष्टमंडळ 5 ते 8 देशांना भेट देणार

शिष्टमंडळ कोणत्या देशांना भेट देणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, प्रत्येक टीममध्ये ५ सदस्य असतील आणि ते सुमारे 10 दिवसांच्या दौऱ्यावर 5 ते 8 देशांना भेट देतील. हे शिष्टमंडळ 23 किंवा 24 मे रोजी रवाना होण्याची शक्यता आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पंतप्रधान मोदींनी खासदारांचे जे गट तयार केले आहेत, ते ऑपरेशन सिंदूर संदर्भात भारताची भूमिका जगासमोर मांडतील. जेव्हा देशाचा प्रश्न असतो, तेव्हा आपण सर्वजण एकत्र असतो आणि परदेशात जाऊन भारताची बाजू मांडतो.”

MPs Supriya Sule and Shrikant Shinde to lead India's voice abroad under Operation Sindoor – a united front against global terrorism."
Pune BJP : निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गृहकलह, शहराध्यक्ष नियुक्ती कार्यक्रमाकडे पदाधिकाऱ्यांची पाठ ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com