Pahalgam Terrorist Attack
Pahalgam Terrorist AttackSarkarnama

Pahalgam Terrorist Attack : "पोलिसांच्या वेशात आले, धर्म विचारला अन्... धाड, धाड, धाड..."; टार्गेट करून घातल्या गोळ्या

Pahalgam Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. पहलगाम खोऱ्यातील एका रिसॉर्टवरती हा हल्ला झाला.
Published on

Pahalgam Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. पहलगाम खोऱ्यातील एका रिसॉर्टवरती हा हल्ला झाला. यात 28 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 ते 15 जण जखमी असल्याची माहिती आहे. याबाबत जम्मू-काश्मीर सरकार, केंद्र सरकार किंवा सुरक्षा दलांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जखमींवर पहलगाममधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

इतर राज्यांतून आलेल्या पर्यटकांना केले टार्गेत :

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगापासून सहा किलोमीटर असलेल्या हॉलिडे रिसॉर्डवरती हा हल्ला झाला आहे. हे रिसॉर्ट रस्त्यापासून काहीसे दूर असल्याने सुरक्षा दलाचे जवानही तिथे उपस्थित नव्हते. अचानक पोलिसांच्या वेशात तीन ते पाच जण तिथे आले. त्यांनी लोकांना नाव आणि धर्म विचारायला सुरुवात केली.

Pahalgam Terrorist Attack
Pahalgam Terrorist Attack : पहलगाम दहशतवादी हल्ला : मोदींनी सौदी अरेबियाहून अमित शहांना लावला फोन अन् दिला 'हा' मोठा आदेश!

काश्मिरी बोलणाऱ्या, मुस्लीम नागरिकांना बाजूला केले आणि निवडून निवडून लोकांना गोळ्या मारल्या. इतर राज्यांतून आलेल्या पर्यटकांवर या दहशतवाद्यांनी अंदाधूंद गोळीबार केला. काहींच्या डोक्यात तर काहींच्या छातीत गोळ्या घातल्या. या हल्ल्यानंतर जवळपास 30 ते 45 मिनिटांनी सुरक्षा दलाचे जवान तिथे पोहोचले आणि मदत सुरु झाली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काश्मीरच्या आरोग्य मंत्र्यांनीही तातडीने रुग्णालयात धाव घेऊन जखमींवरील उपचाराचा आढावा घेतला.

Pahalgam Terrorist Attack
Pahalgam Terror Attack Update : ''जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी...'' ; राहुल गांधी मोदी सरकारवर बरसले!

पंतप्रधान मोदींकडून शहांना सूचना :

दरम्यान, या दहशतवादी हल्ल्याची पंतप्रधान मोदींनी गंभीर दखल घेतली असून, सौदी अरेबियाहून गृहमंत्री अमित शाह यांना थेट फोन लावला आणि तातडीने घटनास्थळी रवाना होण्याचे निर्देश दिले. शिवाय, तेथील सद्य परिस्थितीचा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचेही सांगितले आहे. याचबरोबर अमित शाह यांनीही ताताडीने या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com