Operation Sindoor : भारताच्या एअर स्टाईकमध्ये किती जण मारले गेले? पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफने जाहीर केला आकडा

Operation Sindoor Shahbaz Sharif : पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी भारताच्या ऑपरेश सिंदूरमध्ये मृत्यू झालेले आणि जखमी झालेल्या पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी जाहीर केली आहे.
India officially ends all import and export activities with Pakistan, intensifying diplomatic and economic pressure
India officially ends all import and export activities with Pakistan, intensifying diplomatic and economic pressuresarkarnama
Published on
Updated on

Shahbaz Sharif On Operation Sindoor : भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकव्याप्त काश्मीरमध्ये 100 किलोमीटर आतमध्ये घुसून हल्ला केला. पाकिस्तानमधील 9 ठिकाणांना टार्गेट करण्यात आले. दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यात आले.

हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी ट्विट करत पाकिस्तानच्या सहा ठिकाणांवर हल्ले झाल्याचे म्हटले होते. भारतीय लष्कराने हल्ल्यानंतर किती आंतकवादी मारले गेले याचे आकडेवारी जाहीर केली नाही. मात्र, मिडिया रिपोर्टमध्ये 80 ते 90 जणांचा खात्मा झाल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी हल्लामध्ये मृत्यू झालेले आणि जखमी झालेल्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. शरीफ यांनी सांगितले की, भारताच्या हल्ल्यात 37 पाकिस्तानी नागरिक मारले गेले आणि 40 जण जखमी झाले आहेत.

India officially ends all import and export activities with Pakistan, intensifying diplomatic and economic pressure
Lahore Airport Blast : पाकिस्तान हादरला! लाहौरमधील विमानतळावर तीन स्फोट, मिसाईल हल्ल्याचा प्रत्यक्षदर्शीकडून दावा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांना मारण्यात आले. या हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. त्यांनी लष्कराला कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. पाकिस्तानला धडा शिकवण्याची आणि ज्या महिलांचे कुंकू पुसले त्यांना न्याय देण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर' राबवण्यात आले.

दहशतवाद्यांना संबोधले शहीद

पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी भारतीय हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना शहीद म्हणून संबोधले आहे. काही ठिकाणी दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेला लष्कर अधिकारी उपस्थित राहिले. दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणारा याकूब मूघल हा भारतीय लष्कराच्या एअर स्ट्राईकमध्ये ठार झाला त्याच्या अंत्यविधीला आयएसचे, पाकिस्तान लष्करातील अधिकारी तसेच जवान उपस्थित होते.

India officially ends all import and export activities with Pakistan, intensifying diplomatic and economic pressure
Operation Sindoor India :पाकिस्तानात एअर स्ट्राईक कसा झाला? कोणत्या शस्त्रांचा वापर करण्यात आला? ऑपरेशन सिंदूरचे महत्वाचे मुद्दे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com