मोठी बातमी! खासदारावर भर पत्रकार परिषदेत चाकू हल्ल्याचा प्रयत्न; हत्येचा कट रचला असल्याचा केला आरोप

Delhi press conference News : पत्रकार परिषद सुरू असतानाच अचानक मोठा गोंधळ उडाला. यावेळी खासदारावर भर पत्रकार परिषदेत चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे.
Mp Pappu Yadav
Mp Pappu Yadav Sarkarnama
Published on
Updated on

New Dehli News : दिल्लीत रविवारी अपक्ष खासदार पप्पू यादव यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेवेळी मोठा गदारोळ झाल्याचे समोर आले आहे. यावेळी अचानक एकाने पप्पू यादव यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना मारहाण झाल्याचे समजते. हा प्रकार समोर येताच पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ उडाला. दरम्यान, माझ्या हत्येचा कट रचला गेला प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी हल्लेखोर चाकू घेऊन पत्रकार परिषदेमध्ये आला होता, त्यांनी माझ्या हत्येचा कट रचला होता, असा आरोप पप्पू यादव यांनी केला आहे..

दिल्लीत रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अपक्ष खासदार पप्पू यादव यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ही पत्रकार परिषद सुरू असतानाच अचानक मोठा गोंधळ उडाला. यावेळी पप्पू यादव यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली .

या हल्ल्याच्या प्रकारानंतर खासदार पप्पू यादव यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता, हल्लेखोर चाकू घेऊन पत्रकार परिषदेमध्ये आला होता, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

Mp Pappu Yadav
Akhilesh Yadav BJP Allegation : 'भाजप नोकरीच नव्हे, श्रीराम मंदिराचा चंदाही चोरतो'; अखिलेश यादवांचा गंभीर आरोप, महाराष्ट्र-कर्नाटकच्या उल्लेखाने खळबळ

दरम्यान पप्पू यादव यांनी शुक्रवारी संसदेच्या बाहेर राम मंदिर चोरीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन केले होते. ते साधूचा वेश परिधान करून संसद भवन परिसरात आले होते. या आंदोलनात सर्व विरोधी पक्षदेखील सहभागी झाले होते. विरोधी पक्षांच्या खासदारांच्या हातात दान पेट्या होत्या. पप्पू यादव यांच्या हातात देखील एक दान पेटी होती. खासदारांनी या दान पेटीत पैसे टाकले आणि पप्पू यादव हे ही दान पेटी घेऊन निघून गेले, राम मंदिर चोरीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून राम मंदिर चोरीचे नाट्य रूपांतर करून संसद भवनाबाहेर अनोखे आंदोलन त्यांनी केले होते.

Mp Pappu Yadav
Pune NCP News: राष्ट्रवादीला पुण्यात लवकरच मोठा धक्का बसणार? तडफदार महिला नेत्या लवकरच राजीनामा देणार? पोस्टमधून दिले संकेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com