

New Dehli News : मोदी सरकार लवकरच मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी तातडीने संसदेचं एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावले आहे. 30 नोव्हेंबरला लोकसभेचे विशेष अधिवेशन होणार आहे. तर 2 डिसेंबरला राज्यसभा होणार आहे. 3 डिसेंबरला कामकाज संपणार आहे, याबाबतची माहिती केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करून दिली आहे.
"महत्त्वाचे शासकीय कामकाज पार पाडण्यासाठी सरकारने लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींना अनुक्रमे सोमवार, 30 नोव्हेंबर 2026 रोजी लोकसभेची आणि बुधवार, 2 डिसेंबर 2026 रोजी राज्यसभेची बैठक पुन्हा बोलावण्याची विनंती केली आहे. कामकाजाच्या निकडीनुसार दोन्ही सभागृहांचे कामकाज 3 डिसेंबर 2026 रोजी समाप्त होऊ शकेल." असे ट्विट केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijaju) यांनी केले आहे.
केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी अधिकृतपणे याबाबत माहिती दिली आहे. महत्त्वाच्या शासकीय कामकाजासाठी केंद्र सरकारने संसदेचे हे विशेष सत्र बोलावले आहे. मोदी (Narendra Modi) सरकार येत्या काळात धमाका करण्याच्या तयारीत दिसत आहे. अधिवेशन कशासाठी बोलविण्यात आले आहे, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत परदेश दौरे टाळण्याचा सल्ला मंत्र्यांना दिला होता. त्यासोबतच 15 डिसेंबरपूर्वी कधीही संसदेचे अधिवेशन बोलावले जाऊ शकते, असे संकेतही त्यांनी दिले होते. त्यामुळे सर्व मंत्र्यांनी त्यापूर्वीच आपापली तयारी पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले होते. आता केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून अधिवेशनाच्या तारखांची अधिकृत घोषणा केली आहे.
मात्र, हे एक दिवसीय विशेष अधिवेशन नेमक्या कोणत्या विधेयकांसाठी बोलावण्यात येत आहे, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, या विशेष अधिवेशनात लोकसभेतील विद्यमान 543 जागांची संख्या वाढवून ती कमाल 850 पर्यंत नेण्याचा प्रस्ताव सरकार आणू शकते, अशी चर्चा आहे. यामुळे 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.