Jyotiraditya Scindia : ज्योतिरादित्य शिंदे अन् प्रतिभा धानोरकरांमध्ये लोकसभेतच जुंपली!

Jyotiraditya Scindia vs Pratibha Dhanorkar Lok Sabha clash : प्रतिभा धानोरकर यांनी बुधवारी लोकसभेत बीएसएनएलच्या दुरावस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
Pratibha Dhanorkar, Jyotiraditya Scindia
Pratibha Dhanorkar, Jyotiraditya ScindiaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवारी लोकसभेत काँग्रेसच्या महाराष्ट्रातील खासदार प्रतिभा धानोरकर आणि केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यामध्ये जुंपली होती. धानोरकरांनी बीएसएनएलबाबत विचारलेल्या एका प्रश्नावरून शिंदे यांनी त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या पराभवावरून टोला लगावला.

प्रतिभा धानोरकर यांनी बीएसएनएलच्या दुरावस्थेबाबत लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. मोदी सरकार जगभरात डिजिटल इंडियाचा गाजावाजा करत आहे. त्याचवेळी बीएसएनएलसारख्या कंपनीचे देशभरात जाळे पसरलेले असतानाही रसातळाला या कंपन्या गेल्या आहेत. सरकारी कंपन्यांना बाजूला सारून खासगी कंपन्यांना प्राधान्य दिले जात आहे. तर बीएसएनएलसारख्या कंपन्या बंद करण्याचा सरकारचा मानस आहे का, असा सवाल त्यांनी केला.

Pratibha Dhanorkar, Jyotiraditya Scindia
Maharashtra Assembly : बावनकुळेंसह सहा आमदारांना विधान परिषदेत जाण्यास ‘प्रतिबंध'; काय आहे कारण?

जिओ एअरटेल यांसारख्या खासगी कंपन्या नफा कमवत आहेत. दुसरीकडे बीएसएनएल कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे मानधनही मिळत नाही. या कंपन्या तोट्यात चालल्या आहेत, त्याकडे सरकार लक्ष देणार आहे का, असेही धानोरकरांनी विचारले. त्यावर शिंदे यांनीही मराठीतून बोलण्यास सुरूवात करत धानोरकरांनी महत्वाच्या मुद्द्याकडे सभागृहाचे लक्ष वेधल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

मराठीतूनच उत्तर देताना शिंदे म्हणाले, ‘त्यांच्या (काँग्रेस) काळात बीएसएनएल कंपनीची दुरावस्था झाली होती. आज ही कंपनी दोन हजार कोटींचा नफा कमवत आहे. हे परिवर्तन झाले आहे.’ शिंदे सविस्तर उत्तर देत असतानाच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना थोडक्यात उत्तर देण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा धानोरकर यांना थोडक्यात प्रश्न विचारण्याची संधी दिली.

Pratibha Dhanorkar, Jyotiraditya Scindia
Maharashtra Govt Formation: मोठी बातमी ! महायुतीने केला राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा; एकनाथ शिंदेंनी दिले पत्र

अध्यक्षांच्याच मुद्दा पुढे करत धानोरकर यांनीही शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, मी फक्त थोडक्यात माहिती विचारली होती, मी विभागाची माहिती विचारली नव्हती. जिओ आणि इतर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे ग्राहक किती वाढले, याचे उत्तर देण्याची विनंती त्यांनी केली.

धानोरकर यांच्या या प्रश्नानंतर शिंदे यांनी पुन्हा एकदा मराठीत बोलण्यास सुरूवात करत म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या जनतेजवळ यांचा निर्णय झाला आहे. त्यानंतर आता ते सांगत आहेत की, तुम्ही मोठे उत्तर देऊ नका. जनतेचे उत्तरही त्यांना मान्य नाही. ही त्यांची स्थिती झाली आहे.’ शिंदे यांनी हा टोला लगावण्यामागे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाची पार्श्वभूमी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com