Devendra Fadnavis On Rahul Gandhi : ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ची आठवण येते! राहुल गांधींच्या विधानावर फडणवीसांचा जोरदार पलटवार

Devendra Fadnavis targets Rahul Gandhi over his prediction fall central government, triggering fresh BJP vs Congress political tensions Maharashtra : “केंद्र सरकार वर्षभरात कोसळेल” या राहुल गांधींच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. तसेच नाना पटोले आणि काँग्रेसवरही टीका केल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
Devendra Fadnavis On Rahul Gandhi
Devendra Fadnavis On Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Congress vs BJP political clash : महाराष्ट्रातील भाजप नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्या केंद्र सरकार कोसळण्याच्या विधानावर जोरदार पलटवार करताना “मुंगेरीलाल के हसीन सपने”ची उपमा दिली.

नागपुरातील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांनी काँग्रेसवरही सडकून टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “पूर्वी टीव्हीवर ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ नावाची मालिका यायची. राहुल गांधी यांची वक्तव्ये ऐकली की त्या मालिकेची आठवण येते.” राहुल गांधी यांनी केंद्र सरकार वर्षभरात कोसळेल, असे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांनी हा उपरोधिक टोला लगावला.

राजकीय वर्तुळात या प्रतिक्रियेची जोरदार चर्चा सुरू असून भाजप आणि काँग्रेसमध्ये (Congress) पुन्हा शाब्दिक संघर्ष रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. याआधीही फडणवीसांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेवरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. विशेषतः शरद पवार यांनी अशा वक्तव्यांवर अप्रत्यक्ष नाराजी दर्शवली होती.

Devendra Fadnavis On Rahul Gandhi
55 Minor Girls Mothers : अकोले हादरलं! 55 अल्पवयीन माता; आदिती तटकरे यांच्या खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, राज्य बालहक्क आयोग 'अ‍ॅक्शन मोड'वर

दरम्यान, नागपुरातील गोदाम लॉजिस्टिक पार्कमध्ये उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधांबाबत बोलताना फडणवीसांनी राज्याच्या औद्योगिक विकासावर भर दिला. “शंभर एकरांवर उभारलेली ही सुविधा महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे. जागतिक पुरवठा साखळीत स्पर्धात्मक राहण्यासाठी आधुनिक लॉजिस्टिक व्यवस्था आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

Devendra Fadnavis On Rahul Gandhi
School Uniform Rules : ‘हिजाबविरुद्ध भगवी शाल’ वाद पेटला! सरकारी शाळांमध्ये केशरी शालवर बंदी; कर्नाटकात भाजप आक्रमक

याचवेळी इंधन टंचाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलेल्या टीकेलाही फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. “नाना पटोले यांना त्यांच्या पक्षातच कोणी गंभीरतेने घेत नाही. त्यांना साधा शहराध्यक्षही करता आलेला नाही. त्यामुळे ते आता विनाकारण आमच्यावर राग काढत आहेत,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.

मुख्यमंत्री फडणवीसांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नीट पेपरफुटीवरून राहुल गांधी केंद्रातील शिक्षणमंत्री धर्मेंद प्रधान यांच्यासह मोदी सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहे. आगामी काळात, काँग्रेस अन् भाजपमध्ये राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com