Modi Cabinet : पीयूष गोयल यांचे मंत्रिपद जाणार? पक्षातील नव्या जबाबदारीनंतर चर्चांना फुटले तोंड, कुणाची लागणार वर्णी?

Piyush Goyal BJP treasurer, one person one post : पीयूष गोयल यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत खजिनदारपद; ‘एक व्यक्ती, एक पद’ तत्त्वाला पुन्हा अपवाद होणार का, मंत्रिपदावर गदा येण्याच्या चर्चांना उधाण.
Modi Cabinet
Modi Cabinet Sarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या कार्यकारिणीत समावेश झालेले ते एकमेव केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलामध्ये गोयल यांचे मंत्रिपद जाणार की नाही, याबाबत चर्चेला तोंड फुटले आहे.

पीयूष गोयल हे पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. २०१० ते २०२४ या कालावधीत ते राज्यसभेचे खासदार होते. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते मुंबईतून लोकसभेत पोहोचले. देशात २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यापासून ते मोदींच्या कॅबिनेटमध्ये आहेत. सध्या ते वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचा कार्यभार सांभाळत असले तरी त्यांनी अन्य विभागांच्याही जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

भाजपने नव्या कार्यकारिणीत गोयल यांच्या खांद्यावर खजिनदारपदाची जबाबदारी टाकली आहे. भाजप सत्तेत येण्याआधीही पीयूष गोयल हे खजिनदार होते. मोदी सरकारमध्ये २०१४ पासून ते मंत्रि‍पदावर आहेत. या काळातही त्यांच्याकडे काही वर्षे खजिनदारपद होते. त्यामुळे 'एक व्यक्ती, एक पद' या भाजपच्या तत्वाला या काळात ते अपवाद ठरले होते. आता पुन्हा एकदा त्यांच्याबाबतीत असा अपवाद केला जाणार की नाही, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

Modi Cabinet
Shiv Sena symbol case : एकनाथ शिंदेंचे 39 आमदार अपात्र ठरले असते अन् आयोगाचा फॉर्म्यूला तोच असता तर..! ठाकरेंचे 34 शिलेदार ठरले असते वरचढ

मोदींच्या मंत्रिमंडळातील फेरबदलाची मागील काही महिन्यांपासून सातत्याने चर्चा होत आहे. पीयूष गोयल यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील समावेशाने ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. सध्या भारत आणि अमेरिकेतली व्यापार करार महत्वाच्या टप्प्यावर आहे. असे असताना गोयल यांना मंत्रि‍पदावरून हटविले जाणार नाही. यापूर्वीप्रमाणेच मंत्रिपद आणि खजिनदार अशी दोन्ही पदे त्यांच्याकडेच ठेवली जाऊ शकतात, अशीही चर्चा आहे.

Modi Cabinet
Vinod Tawde news : विनोद तावडेंवर उत्तर प्रदेशची जबाबदारी; नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या घोषणेनंतर काही तासांतच प्रभारीपदी नियुक्ती...

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहे. आपच्या राज्यसभेतील सहा खासदारांनीही भाजपची वाट धरली आहे. तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी एनडीएला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या खासदारांपैकी काही जणांना मंत्रिमंडळात घेतले जाणार असल्याचे अंदाज वर्तविले जात आहेत. त्यांना सामावून घेताना कुणाचा पत्ता कापला जाणार, याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com