Arvind Kejriwal News : 'अरविंद केजरीवाल यांची हळूहळू हत्या होत आहे', सौरभ भारद्वाज यांचा गंभीर आरोप

Saurabh Bhardwaj : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मधुमेह असताना त्यांना तुरुंगात प्रशासन इन्सुलिनची सुईही द्यायला तयार नाही. त्यांच्या विरोधात बातम्या पेरल्या जात आहेत, असा आरोप सौरभ भारद्वाज यांनी केला.
Saurabh Bhardwaj  Arvind Kejriwal
Saurabh Bhardwaj Arvind Kejriwalsarkarnama

Loksabah Election : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तुरुंगात आहेत. त्यांना मधुमेह आहे. मात्र, बेल मिळवण्यासाठी ते आपल्या आहारात गोड पदार्थ खात असल्याचा दावा ईडीकडून न्यायालयात करण्यात आला होता, तर घरून 48 वेळा जेवण आले मात्र आपण तीनच वेळा आंबा खाल्ला, असा प्रतिवाद अरविंद केजरीवाल यांच्याकडून करण्यात आला. मात्र, आता आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी तुरुंगात अरविंद केजरीवाल यांची हळूहळू हत्या करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Saurabh Bhardwaj  Arvind Kejriwal
Fadnavis Vs Thackeray : आदित्यला मुख्यमंत्री काय, मंत्री बनवण्याचाही विचार नव्हता'; फडणवीसांनी ठाकरेंचा दावा ठरवला खोटा

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मधुमेह असताना त्यांना तुरुंगात प्रशासन इन्सुलिनची सुईही द्यायला तयार नाही. त्यांच्या विरोधात बातम्या पेरल्या जात आहेत. भाजप (BJP) मुख्यमंत्र्यांच्या प्रकृती विरोधात दररोज खोटी विधानं करत आहे. तुरुंगात त्यांची हळूहळू हत्या होत आहे, असा गंभीर आरोप सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची इन्सुलिनची पातळी वाडत आहे. अशा स्थितीत त्यांना कोर्टात अर्ज दाखल करावा लागतो आहे. त्यांच्या विरोधात मोठं षडयंत्र रचत आहेत, असेदेखील सौरभ भारद्वाज म्हणाले. मुख्यमंत्री केजरीवाल यांना इन्सुलिन हवे आहे. मात्र, तुरुंग प्रशासन आणि भाजपचे लोक नाही म्हणतात. त्यांना सुई देण्याची गरज नसल्याचे सांगतात.

दरम्यान, सौरभ भारद्वाज यांनी अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात कोणताही पुरावा सीबीआय ईडीला मिळालेला नाही. सामान्य जनता ईडीच्या खोट्या आरोपांवर विश्वास ठेवायला तयार नाही. त्यामुळे अरविंद केजरीवाल कसे भ्रष्टाचारी आहेत हे सांगणाऱ्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, असा दावा केला होता.

R

Saurabh Bhardwaj  Arvind Kejriwal
Parbhani Loksabha Constituency News : मोदींच्या कौतुकाने परभणीकर जानकरांची 'शिट्टी' वाजवणार का ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com