Amravati News : उद्धव ठाकरेंनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत 'आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार होते. खुद्द फडणवीस यांनीच मला हे सांगितलं होतं. मात्र, फडणवीसांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटं ठरवलं.'; असा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरेंच्या याच आरोपावर आता देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Fadnavis Vs Thackeray)
अमरावती येथे भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. या वेळी त्यांनी ठाकरेंसह महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ही लोकं बेगडी आहेत. ज्यांना खोटं बोल पण रेटून असं यांचं काम आहे. आज तर कहर झाला, खरं बोलायला विचार करावा लागत नाही , खोटं बोलायला विचार करावा लागतो. एकदा खोटं बोललं की, वारंवार खोटं बोलावं लागतं.आणि मग एखादेवेळी पोल उघडली जाते. आज उद्धव ठाकरेंची पोल उघडली असं ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा दावा खोडून काढला. ते म्हणाले, आमचे जुने मित्र उद्धव ठाकरे हे सध्या थोडे भ्रमिष्ट झाले आहेत. आज ते असे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी मला असं सांगितलं होतं की,आदित्य ठाकरेंना Aaditya Thackeray मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीला जाईन. त्यांना वेड लागलं असेल, पण मला तर नाही ना, असा सवाल करत ठाकरेंना खोचक टोला लगावला.
तसेच कालपर्यंत त्यांना भ्रम होता की, अमित शाहांनी कुठल्यातरी खोलीत नेऊन सांगितलं मुख्यमंत्री करेन. आता त्यांना नवा भ्रम होत आहे की, मी आदित्यला मुख्यमंत्री करेन असं सांगितलं. पण उद्धवजी एक काय ते ठरवा, अमित शाहांनी सांगितले की, मी सांगितले. सत्ता गेल्यामुळे ते भ्रमिष्ट झाले आहेत. एक खोटं बोललं की, वारंवार खोटं बोलावं लागतं, आज ते सपशेल उघडे पडले आहेत, असेही फडणवीस म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, हो मी त्यांना सांगितले होते, आदित्य ठाकरेला लढवा. कारण पुढे तुमचा पक्ष त्याला सांभाळायचा आहे. काहीतरी ट्रेनिंग त्याला द्यायला पाहिजे. पण मुख्यमंत्री तर सोडाच त्याला मंत्री बनवण्याचाही विचार नव्हता, तर आज त्यांच्या पक्षाची अशी अवस्था झाली नसती, असा चिमटाही फडणवीसांनी आपल्या भाषणात या वेळी ठाकरेंना काढला.
उद्धव ठाकरे Uddhav Thackeray म्हणाले, "शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार, असं वचन मी बाळासाहेबांना दिलं होतं. शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तेचं सम-समान वाटप होईल. शिवसेना आणि भाजपकडे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद पद असेल, असं अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत ठरलं होतं. आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार होते. खुद्द फडणवीस यांनीच मला हे सांगितलं होतं. मात्र, फडणवीसांनी माझ्याच लोकांसमोर मला खोटं ठरवलं."
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.