PM Kisan 23th installment : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: जून महिना सुरू झाला तरी पीएम किसानचा हप्ता खात्यात नाही; पैसे नेमके कधी मिळणार?

PM Kisan installment be credited : जून महिना सुरू झाला तरी पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता खात्यात जमा झालेला नाही. जाणून घ्या संभाव्य तारीख, पात्रता आणि स्टेटस तपासण्याची प्रक्रिया.
PM kisan Yojana
PM kisan Yojana Sarkarnama
Published on
Updated on

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी आर्थिक मदत जमा होते. या वर्षी 13 मार्चला 22 वा हप्ता जमा करण्यात आसा होता. मात्र, आता जून महिना उजाडला तरी २३ वा हप्ता शेतकऱ्यांचा खात्यात जमा झाला नाहीये. त्यामुळे सध्या सर्वांचेच लक्ष 23 व्या हप्त्याकडे लागले आहे.

मागच्या हप्त्याला तीन महिने उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात नवीन हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे हा हप्ता नेमका कधी मिळणार याबाबत शेतकरी उत्सुक आहेत. विशेष म्हणजे हंगामाच्या तयारीसाठी आर्थिक मदतीची गरज असते त्यामुळे शेतकरी सरकारच्या घोषणेकडे डोळे लावून बसले आहेत.

PM kisan Yojana
Assistant Commissioner Suspended : जनगणनेच्या कामात हलगर्जीणाचा ठपका; पुण्यात प्रभारी सहाय्यक आयुक्तांचे निलंबन

सध्या कृषी मंत्रालयाकडून 23 व्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, मागील काही वर्षांच्या नोंदी पाहिल्यास पहिला हप्ता साधारणपणे जून, जुलै किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाही याच कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील वर्षांचा विचार केला तर 2023 मध्ये 14 वा हप्ता जुलैमध्ये देण्यात आला होता. त्यानंतर 2024 मध्ये 17 वा हप्ता जून महिन्यात जमा झाला होता. तर 2025 मध्ये हा हप्ता ऑगस्टमध्ये वितरित करण्यात आला. त्यामुळे यंदाचा 23 वा हप्ता देखील याच कालावधीत येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, हवामान विभागाने यंदाच्या पावसाबाबत काही महत्त्वाचे अंदाज व्यक्त केले आहेत. देशातील काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत वेळेत मिळावी यासाठी सरकार जून किंवा जुलैमध्येच हप्ता जारी करू शकते, अशी चर्चा सुरू आहे.

PM kisan Yojana
Sanjay Raut : विधान परिषद निवडणूक; संजय राऊत हे काय बोलून गेले...

तथापि, पीएम किसान योजनेच्या 23 व्या हप्त्याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा होईपर्यंत शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी, बँक खाते आणि जमीन नोंदी अद्ययावत असल्याची खात्री करून घ्यावी, जेणेकरून हप्ता जमा होण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com