Assistant Commissioner Suspended : जनगणनेच्या कामात हलगर्जीणाचा ठपका; पुण्यात प्रभारी सहाय्यक आयुक्तांचे निलंबन

Pune census work negligence case : जनगणनेच्या कामात कथित हलगर्जीपणाचा ठपका ठेवत पुण्यात प्रभारी सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.
PMC News
PMC News Sarkarnama
Published on
Updated on

जनगणनेच्या कामात निष्काळजीपणा आणि राष्ट्रीय कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी येरवडा-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम यांना निलंबित करण्यात आले आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी आज हे आदेश दिले.

गुर्रम यांच्याकडे जनगणनेसाठी प्रगणक नोंदणी, नियुक्तीपत्रे, घरयादी गट तयार करणे आणि प्रशिक्षणाचे नियोजन अशी महत्त्वाची जबाबदारी होती. १६ मेपासून सुरू झालेले हे काम १४ जूनपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र, गुर्रम यांनी मनुष्यबळाचे आणि प्रक्रियेचे योग्य व्यवस्थापन न केल्याने कामकाज रखडल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

PMC News
Sanjay Raut : विधान परिषद निवडणूक; संजय राऊत हे काय बोलून गेले...

आयुक्त नवलकिशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी वारंवार सूचना देऊनही गुर्रम यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. येरवडा-वडगाव शेरी भागातील एक हजार ३९ प्रगणक गटांपैकी केवळ ५४० गटांत काम सुरू झाले असून, उर्वरित ४९९ गटांतील काम अद्याप प्रलंबित आहे.

या गंभीर बाबीची दखल घेत महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम ५६ (२) (फ) नुसार चौकशी पूर्ण होईपर्यंत गुर्रम यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांना महापालिका क्षेत्र सोडण्यास मनाई केली असून, त्यांच्याविरुद्धची खातेनिहाय चौकशी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश उपायुक्तांना दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com