Congress news : पंतप्रधान-गृहमंत्री ही जोडी नक्की कोणता खेळ खेळत आहे? काँग्रेस नेत्याने व्यक्त केली भीती

Narendra Modi, Amit Shah, Jairam Ramesh, BJP, PM Modi News : अद्याप अधिकृतपणे संपवले नसलेले पावसाळी अधिवेशन पुन्हा कधी बोलावले जाणार आहे, हेही आतापर्यंत स्पष्ट नाही, असे जयराम रमेश म्हणाले आहेत.
Amit Shah, Narendra Modi
Amit Shah, Narendra Modisarkarnama
Published on: 
Updated on: 

Parliament Session row : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील आठवड्यात सोशल मीडियात पोस्ट करत एका नव्या व्हिडिओ गेमच्या माध्यमातून विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. भारत नवा खेळ खेळत आहे, असे म्हणत पंतप्रधानांनी यूपीए सरकार आणि एनडीए सरकारमधील विकासाची तुलना केली होती. त्यानंतर आता काँग्रेसनेही पलटवार केला आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियात एक पोस्ट करत पंतप्रधान आणि गृहमंत्री ही जोडी (अजूनही एकत्र असेल तर) नक्की कोणता खेळ खेळत आहे?, असा सवाल केला आहे. संसदेच्या अधिवेशनावरूनही त्यांनी विचारणा केली आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार असेल, तर ते कधी होणार, याची माहिती आतापर्यंत व्हायला हवी होती, असेही काँग्रेस नेते म्हणाले आहेत.

अद्याप अधिकृतपणे संपवले नसलेले पावसाळी अधिवेशन पुन्हा कधी बोलावले जाणार आहे, हेही आतापर्यंत स्पष्ट नाही. लोकसभेत कोणत्याही मार्गाने (अनैतिक मार्गांचा वापर करूनही) दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्याची या जोडीची धडपड सुरू आहे. मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत (Delimitation) काही विशिष्ट 'फॉर्म्युला' असेल, तर त्याबाबत माहिती असण्याचा देशाला पूर्ण अधिकार आहे, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

Amit Shah, Narendra Modi
Congress news : मला काँग्रेसमध्ये परत यायचंय, माफ करा! विरोध होताच भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या लेकीने जोडले हात

एकतर ही जोडी पूर्णपणे गोंधळलेली असून स्वतःच रचलेल्या खोट्या दाव्यांच्या जाळ्यात अडकली आहे; किंवा मग, काहीतरी अत्यंत कटकारस्थान शिजत असल्याचे अधिवेशनाबाबत असलेल्या सततची अनिश्चिततेवरून दिसते, असा मोठा दावा जयराम रमेश यांनी केला आहे.

Amit Shah, Narendra Modi
Rekha Patra on Ventilator : 'संदेशखाली'च्या नायिका भाजप आमदार व्हेंटिलेटरवर; धक्कादायक कारण आले समोर, षडयंत्र की आणखी काही?

कोणत्याही परिस्थितीत, या 'जी.टी.ए.' (Gyanesh Theft Arrangers) जोडीचे खरे रूप पूर्णपणे उघड झाले आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या जोडीच्या कारस्थानांमुळे संसद अधिकच कमकुवत होत चालली आहे, अशी टीकाही जयराम रमेश यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.