Rekha Patra on Ventilator : 'संदेशखाली'च्या नायिका भाजप आमदार व्हेंटिलेटरवर; धक्कादायक कारण आले समोर, षडयंत्र की आणखी काही?

Rekha Patra Health Update, Rekha Patra on Ventilator, Hingalganj MLA, Sandeshkhali Movement : रेखा पात्रा या पश्चिम बंगालमधील २०२४ च्या संदेशखाली आंदोलनातील एक प्रमुख चेहरा होत्या. या आंदोलनादरम्यान, रेखा पात्रा यांना धमक्याही आल्या होत्या.
Rekha Patra Health Update
Rekha Patra Health UpdateSarkarnama
Published on: 
Updated on: 

West Bengal BJP MLA news : पश्चिम बंगालमधील हिंगलगंज मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार रेखा पात्रा यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. घरात अत्यवस्थ अवस्थेतच त्यांना शनिवारी दुपारीच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजूनही त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नसल्याचे वृत्त आहे.

प्राथमिक माहितीनुसार, रेखा पात्रा यांना विषबाधा झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर कोलकाता येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या शरीरात कीटकनाशकाचे अंश आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.

पोलिसांकडून घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या नातेवाईकांकडेही विचारपूस केली जात आहे. रेखा पात्रा यांना विषबाधा कशी झाली, याबाबत तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला की आत्महत्येचा प्रयत्न, अशा चर्चांना राज्यात उधाण आले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून सर्व बाजूने तपास केला जात आहे.

Rekha Patra Health Update
Congress news : मला काँग्रेसमध्ये परत यायचंय, माफ करा! विरोध होताच भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या लेकीने जोडले हात

संदेशखालीच्या नायिका

रेखा पात्रा या पश्चिम बंगालमधील २०२४ च्या संदेशखाली आंदोलनातील एक प्रमुख चेहरा होत्या. लोकसभा निवडणुकीआधी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथे महिलांवरील छळ, जमिनी बळकावणे आणि खंडणीच्या आरोपांविरोधात रेखा पात्रा यांनी आवाज उठविला होता. त्यानंतर या आंदोलनाचा आवाज देशभरात पोहोचला होता. या आंदोलनामुळे तत्कालीन तृणमूल काँग्रेस सरकार बॅकफूटवर गेले होते. या आंदोलनादरम्यान, रेखा पात्रा यांना धमक्याही आल्या होत्या.

Rekha Patra Health Update
BJP MLA PA Wife Election Defeat : भाजप आमदाराच्या 'पीए'ला पत्नीचा पराभव जिव्हारी; निकालानंतर काही तासांतच गावातील पथदिवे हटवले

संदेशखाली आंदोलनानंतर भाजपने रेखा पात्रा यांना बसीरहाट मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर भाजपने २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत त्या हिंगलगंज मतदारसंघातून तिकीट दिले. या निवडणुकीत त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. तर राज्यातील तृणमूल काँग्रेसची राज्यातील सत्ताही गेली. राज्यात भाजपची सत्ता येण्यास संदेशखाली आंदोलनासह आर. जी. कर रुग्णालयातील बलात्कार व हत्येची घटनाही कारणीभूत ठरल्याचे मानले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.