PM Modi Lok Sabha Election Interview : 'पंतप्रधान म्हणून नाही तर रामभक्त ...' राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यावर मोदींचं मोठं विधान

Lok Sabha Election News : सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून निमंत्रण देण्याची परंपरा आपल्याकडे आहे. नेहरूंनी ते निमंत्रण नाकारले. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले ते नाकारणे ही काँग्रेसच्या 'व्होट बँक' मजबुरी आहे.
PM Modi
PM Modi Sarkarnama
Published on
Updated on

PM Modi Interview With ANI : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. पंतप्रधान राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे राजकारण करत असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला होता. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एनएआय' या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेसनेच Congress राम मंदिराचे राजकारण केल्याचा आरोप केला.

PM Modi
PM Modi Interview 2024 : '..त्यामुळेच मी म्हणतोय जे झालंय तो केवळ ट्रेलर होता'; पंतप्रधान मोदींनी केलं स्पष्ट!

'राम मंदिराचा (ram mandir) प्रश्न न्यायालयात गेला तेव्ह ना जनसंघ होती, ना भाजप. राम मंदिराचे राजकारण कोणी केले? न्यायालयात हे प्रकरण सुरू होते. तेथे निर्णय येऊ नये म्हणून अडथळे निर्माण केले. त्यांच्यासाठी हे राजकारणाचे साधन होते. आता राम मंदिर झाले आहे. त्यांच्या हातातून तो मुद्दा गेला आहे. राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा नाही तर अस्थेचा विषय आहे', असा टोला पंतप्रधान मोदींनी (Congress) काँग्रेसला लगावला.

सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून निमंत्रण देण्याची परंपरा आपल्याकडे आहे. नेहरूंनी ते निमंत्रण नाकारले. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले ते नाकारणे ही काँग्रेसच्या 'व्होट बँक' मजबुरी आहे. मला जेव्हा राम मंदिरासाठी निमंत्रण मिळाले. तेव्हा मी तो कार्यक्रम पंतप्रधान म्हणून नव्हे तर रामभक्त म्हणून केला, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रामभक्त म्हणून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्याआधी मी 11 दिवसांचा अनुष्ठान केलं. मी 11 दिवस जमीनवर झोपलो. नारळाच्या पाण्यावर राहिलो. राम मंदिर झाल्यावर काय होईल, अशी भीती काँग्रेस घालत होते. पाहा काहीच नाही झाले. काँग्रेसच्या हातातून हा मुद्दा गेलेला आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला.

R

PM Modi
Ratnagiri Sindhudurg Loksabha : नारायण राणे-किरण सामंतांच्या उमेदवारीचा अंतिम निर्णय दिल्लीत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com