PM Modi Foreign Visit: पेट्रोल-गॅस संकटात PM मोदींचा 5 देशांचा दौरा; भारतासाठी काय घेऊन येणार? 5 मुद्द्यांत जाणून घ्या

PM Narendra Modi begins five-country tour: पेट्रोल-गॅस संकट, जागतिक अस्थिरतेच्या काळात PM मोदी UAE, नॉर्वे, इटली, स्वीडन आणि नीदरलँड्स दौऱ्यावर आहेत, जाणून घ्या भारतासाठी त्यांच्या दौऱ्याला काय महत्व आहे.
PM Modi Foreign Visit
PM Modi Foreign VisitSarkarnam
Published on
Updated on

Modi 5 nation visit : पेट्रोल-गॅस संकट, अमेरिका-इराण-इराक तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून 5 देशांच्या दौऱ्यावर आहेत. जागतिक स्तरावर वाढलेला तणाव, तेल आणि गॅस पुरवठ्यात निर्माण झालेली अनिश्चितता तसेच जागतिक अर्थव्यवस्थेवरील दबाव या पार्श्वभूमीवर या दौऱ्याकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.

या दौऱ्याची सुरुवात युनाटेड यूएई ( United Arab Emirates) येथून झाली आहे. यानंतर मोदी नेदरलॅंड. स्वीडन, नार्वे, आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. या दौऱ्याचा मुख्य फोकस ऊर्जा सुरक्षा, व्यापार, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, ग्रीन एनर्जी आणि जागतिक भागीदारी मजबूत करणे हा आहे.मोदींच्या संपूर्ण दौऱ्याचा सर्वात मोठा उद्देश काय आहे? हे समजून घेऊयात

पंतप्रधान मोदी यांचा हा विदेश दौरा केवळ विविध देशांना भेट देणे, हस्तांदोलन करणे किंवा औपचारिक बैठका घेणे एवढ्यापुरता मर्यादित नाही. या दौऱ्यामागे भारताची दीर्घकालीन रणनीती, आर्थिक हितसंबंध आणि जागतिक स्तरावर आपली ताकद वाढवण्याचा मोठा उद्देश आहे.

मिडल ईस्टमधील तणाव, तेल-गॅस पुरवठ्यावरील संकट आणि बदलती जागतिक समीकरणे लक्षात घेता भारताने या दौऱ्याद्वारे एकाच वेळी अनेक महत्त्वाच्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

१) ऊर्जा सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य

सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारतासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे तेल आणि गॅस पुरवठा सुरळीत ठेवणे. मिडल ईस्टमधील संघर्षामुळे सप्लाय चेनवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर UAE आणि नॉर्वेसारख्या ऊर्जा समृद्ध देशांसोबत भारत दीर्घकालीन ऊर्जा करार करण्याच्या तयारीत आहे. भारताला भविष्यात तेल-गॅस टंचाईचा फटका बसू नये, हा या दौऱ्यामागचा सर्वात मोठा उद्देश मानला जात आहे.

PM Modi Foreign Visit
NEET UG 2026: नीट परीक्षेची नवी तारीख जाहीर! नोंदणी अन् परीक्षा केंद्र कायम राहणार, 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळणार

२) व्यापार आणि गुंतवणुकीला चालना

भारत आणि युरोपदरम्यान नुकताच मोठा मुक्त व्यापार करार (FTA) झाला आहे. PM मोदींच्या या दौऱ्याद्वारे तो अधिक वेगाने लागू करण्यावर भर दिला जाणार आहे.

यासोबतच भारतात अधिक विदेशी गुंतवणूक आणणे, भारतीय कंपन्यांना युरोपियन बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि नवीन व्यावसायिक करारांना गती देणे, हेही या दौऱ्याचे महत्त्वाचे लक्ष्य आहे.

PM Modi Foreign Visit
IAS Transfer: फडणवीस सरकारचा बदल्यांचा धडाका; डॉ. पुलकुंडवार ग्रामविकास विभागाचे नवे सचिव, चार IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

३) भविष्यातील तंत्रज्ञानात भागीदारी

या दौऱ्याचा आणखी एक मोठा फोकस म्हणजे भविष्यातील तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवणे.

नीदरलँडकडून जलव्यवस्थापन आणि सेमिकंडक्टर तंत्रज्ञान

स्वीडनकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), स्टार्टअप्स आणि हरित तंत्रज्ञान

युरोपियन देशांकडून ग्रीन हायड्रोजन आणि स्वच्छ ऊर्जा

या क्षेत्रांमध्ये भारत केवळ तंत्रज्ञान घेण्याचा प्रयत्न करत नाही, तर संयुक्त भागीदारीतून दीर्घकालीन विकास साधण्याचा प्रयत्न करत आहे.

४) जगात भारताची मजबूत प्रतिमा निर्माण करणे

या संपूर्ण दौऱ्यातून भारत जगाला एक स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे — जागतिक अस्थिरता वाढली असली तरी भारत स्वतंत्र आणि संतुलित परराष्ट्र धोरणावर ठाम आहे.

भारत एकाच वेळी युरोपियन देश, खाडी देश आणि इतर रणनीतिक भागीदारांसोबत मजबूत संबंध ठेवू शकतो, हे या दौऱ्यातून अधोरेखित होत आहे.

PM Modi Foreign Visit
Mumbai Pune Expressway Alternative: मुंबईला जाण्यासाठी पुणेकरांना नवा सुपरफास्ट मार्ग; नेरळ-शिरूर महामार्गाला हिरवा कंदील

५) जागतिक ताकद वाढवण्याचा मोठी रणनीती

हा दौरा म्हणजे भारताचा महत्वाचा मानला जात आहे. ऊर्जा सुरक्षा, नवे तंत्रज्ञान, व्यापार, संरक्षण सहकार्य आणि जागतिक स्तरावरील प्रभाव — या सर्व क्षेत्रांमध्ये भारताला अधिक मजबूत बनवण्याचा प्रयत्न या दौऱ्याद्वारे केला जात आहे.

थोडक्यात, PM मोदींचा हा दौरा केवळ राजनैतिक कार्यक्रम नसून भारताच्या भविष्यातील आर्थिक आणि रणनीतिक दिशेचा महत्त्वाचा भाग मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com