Modi-Meloni : "मोदी-फडणवीस चोरीचा माल आहेत", काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान; मोदींना म्हणाले, मेलोडीचा पोरखेळ...

Modi-Meloni : देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरण्याऐवजी पंतप्रधानांना देशाच्या मूलभूत प्रश्नांपासून पळून न जाता हिंमतीने उपाययोजना करण्याचा सल्ला द्यावा, असंही त्यांनी म्हटलं आहे.
devendra fadnavis | narendra modi
devendra fadnavis | narendra modisarkarnama
Published on
Updated on

Taliban 'Vergin Girl' Law : लग्नासंबंधी कुमारीका मुलींबाबत तालिबानचा नवा कायदा! धार्मिक न्यायालयांची वाढवली पॉवर

Modi-Meloni : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत. यांपैकी मोदी सध्या तिसऱ्या देशात म्हणजेच इटलीत आहेत. याठिकाणी त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत द्वीपक्षीय चर्चा केली. त्यानंतर दोघांमधील काही हलक्या फुलक्या क्षणांचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले. एका व्हिडिओत तर मोदींनी मेलोनींना भारतातील पारलेचं मेलोडी हे प्रसिद्ध चॉकलेट गिफ्ट दिलं. यावरुन मोदींना मोठ्या ट्रोलिंगला समोरं जावं लागलं आहे. त्याच्यावर विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनीही सडकून टीका केली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधीवर पलटवार केला. यावरुन आता काँग्रेसचे इतर नेते आक्रमक झाले असून महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी-फडणवीसांना थेट चोरीचा माल असं संबोधलं आहे. त्यांच्या याविधानामुळं वाद होण्याची शक्यता आहे.

devendra fadnavis | narendra modi
Taliban 'Vergin Girl' Law : लग्नासंबंधी कुमारीका मुलींबाबत तालिबानचा नवा कायदा! धार्मिक न्यायालयांची वाढवली पॉवर

नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

"नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे चोरीचा व डकेतीचा माल आहेत. ईव्हीएम मॅनेज करणे, बोगस मतदार याद्या, एसआयआर सारख्या वेगवेगळ्या मार्गाने जनतेचा मतदानाचा अधिकार डावलून केंद्र आणि राज्यातील सरकारी यंत्रणांचा वापर करून लोकशाहीचा खून भाजपने केला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाची आर्थिक स्थिती, विदेश नीती, बेरोजगारी, पेपरफुटी आणि महागाई या मुद्द्यांवर उपाययोजना करण्यात आलेलं अपयश आणि जनतेला काटकसर करण्याचा उपदेश देत स्वतः पाच पाच देशाच्या दौऱ्यावर पळून जाण्याच्या प्रधानमंत्र्यांच्या कृतीचा विरोध केला आहे.

devendra fadnavis | narendra modi
PMC Action on Motegaonkar: मोटेगावकरला दणका! पुण्यातील क्लासेस बंद; डेक्कनच्या इमारतीला महापालिकेनं ठोकलं टाळं

तसेच विदेशी महिला पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर न देता मान खाली घालून देशाची गरिमा धुळीस मिळवण्याच्या कृत्याचा विरोध केल्याने फडणवीसांना मिरच्या झोंबल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरण्याऐवजी पंतप्रधानांना देशाच्या मूलभूत प्रश्नांपासून पळून न जाता हिंमतीने उपाययोजना करण्याचा सल्ला द्यावा व विदेशात महिला पंतप्रधानांना मेलोडी चॉकलेट गिफ्ट देऊन खी खी ख्या ख्या करत पोरखेळ चाळे बंद करण्याचे उपदेश द्यावेत, असंही पटोले यांनी म्हटलं आहे.

devendra fadnavis | narendra modi
Fadnavis Government : एका मंत्र्याच्या हट्टामुळे फडणवीस सरकारवर मोठी नामुष्की : वाजतगाजत सुरू केलेला तोट्यातील प्रकल्प गुपचूप गुंडाळला

"नीट पेपरफुटीमध्ये सीबीआयने अटक केलेले दहा पैकी सहा आरोपी हे महाराष्ट्रातील आहेत. पेपर सेट करणारेच पेपर फोडत आहेत, राज्याचे गृहखाते काय करत आहे? राज्याच्या गृहमंत्र्यांनी राज्यातील गुन्हेगारी कमी करण्यावर लक्ष द्यावे. खासदार राहुल गांधी यांच्यावर असांस्कृतीक भाषेत टीका करण्याएवढी आपली उंची नाही हे लक्षात ठेवावे. बाकी जनता कोणाला फेकू, खोटेंद्र आणि अनाजीपंत म्हणते हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे पण असं बोलणं ही काँग्रेसची संस्कृती नाही" असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com