

Heatwave Warning News : देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटांना कहर केला असून भर दुपारी नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना हवामान विभागाने या आधीच दिल्या आहेत. तसेच आता पुढील २४ तासांत तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशातील नागरिकांना मोठं आवाहन केलं असून त्यांनी नागरिकांना पाणी जास्त पिण्यासह पशु पक्ष्यांसाठीही पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे. तसेच तहानलेल्या व्यक्तीला देखील एक ग्लास पाणी अवश्य द्या असा सल्ला देताना आई-वडील, आजी-आजोबा आणि इतर जवळच्या नातेवाईकांची विचारपूस करा असे ही म्हटले आहे.
देशात एकीकडे उष्णतेची लाट उसळली असून राज्यात देखील सुर्य आग ओकताना दिसत आहे. विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम असून ब्रह्मपुरी राज्यातील सर्वाधिक तापमान असणारे ठिकाण ठरले आहे. येथे हंगामातील सर्वाधिक ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच पुढील २४ तासांत तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट करत देशातील नागरिकांना आवाहन केलं आहे. त्यांनी, आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, देशात वेगवेगळ्या भागात तापमान वाढत असून जनजीवनावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. यामुळे सर्व देशावासियांनी काळजी घेण्याची गरज आहे. तर स्वत:ला हायड्रेट ठेवा, घरातून बाहेर निघताना पाणी सोबत ठेवा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
तसेच पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पोस्टमध्ये, सध्याच्या अशा वातावरणात देशवासियांची संवेदनशीलता मोठा आधार ठरू शकते. एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला पाण्याचा एक ग्लास द्या. जे घराजवळ, दुकानाजवळ भांड्यात वाटसरूंसाठी पाणी ठेवतात अशा लोकांचं मी कौतुक करेन असेही त्यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर मोदींनी, कडक उन्हामुळे चक्कर येणं, थकवा जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला देताना जर एखादी व्यक्ती बेशुद्ध झाली किंवा अस्वस्थ वाटू लागलं तर त्यांना सावलीत न्या. पाणी, ओआरएस किंवा शरिराला ऊर्जा मिळेल असे पदार्थ द्या असेही आवाहन जनतेला केलं आहे.
याचबरोबर पंतप्रधान मोदींनी त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये, आपले आई-वडील, आजी-आजोबा आणि इतर जवळच्या व्यक्तींची फोनवरून प्रकृतीची विचारपूस करा असेही म्हटलं आहे. तर आपल्या नात्यातील लोकांना पुरेसं पाणी पिण्यास सांगा, दुपारी उन्हात बाहेर पडू नका आणि विश्रांती घेण्यास सांगत विनंती करा असाही सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.