PM Modi : सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींवर केलेल्या टिप्पणीवर PM मोदींचं मोठं विधान; म्हणाले, स्वतःच कबर...

राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या संसदीय दलाची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींना फटकारल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधीपक्षांवर निशाणा साधला.
Pm Modi and Rahul Gandhi
Pm Modi and Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी एनडीएच्या संसदीय दलाची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर सविस्तर चर्चा केली. त्याचबरोबर पावसाळी अधिवेशनाबाबतही त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी सुप्रीम कोर्टानं चीनच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींना नुकतंच फटकारलं त्यावरही मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.

Pm Modi and Rahul Gandhi
Indian Army : मोदी सरकारनंतर भारतीय लष्कराकडूनही अमेरिकेवर पलटवार; ट्रम्प यांची बोलती केली बंद

बैठकीत मोदींनी जोरदारपणे विरोधकांना टार्गेट केलं आणि म्हणाले, "राहुल गांधी स्वतःची राजकीय कबर स्वतः खोदत आहेत". काही खासदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, पंतप्रधानांनी सर्व घटकपक्षांच्या सहकाऱ्यांना हे आश्वासन दिलं की, देश सर्वकाही बघत आहे. कदाचित संसदेत हवं तसं काम होत नसेल पण तरीही बरंच काही सुरु आहे. तसंच देशाची प्रत्येक गोष्टीवर नजर आहे. मोदींनी या बैठकीत खासदारांना नेमकं काय संबोधित केलं याची माहिती काही खासदारांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.

Pm Modi and Rahul Gandhi
Language Debate: नुसते कानाखाली आवाज काढल्याने, पाट्या स्थानिक भाषेतून केल्याने काहीच फायदा होणार नाही!

मोदींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच म्हटलं की, "मी भारताची बाजू मांडण्यासाठी उभा राहिलो आहे. राहुल गांधींबाबतही मोदी या बैठकीत काही गोष्टी बोलले. नुकतेच सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींच्या चीनसंदर्भातील विधानावरुन फटकारलं. "तुम्ही सच्चे भारतीय असाल तर अशी विधान करणार नाही," असं कोर्टानं राहुल गांधींना म्हटलं होतं. याचा उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला.

Pm Modi and Rahul Gandhi
Girish Mahajan Politics : गिरीश महाजनांचे वेगळेच संकेत, जळगावची सगळी समीकरणं बदलणार..

राहुल गांधींवर हल्लाबोल करताना राहुल गांधींनी भारतीय सैन्याबद्दल अपरिपक्व आणि बेपर्वा विधाने केल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. भारताला अखंड ठेवणाऱ्या मूल्यांपासून स्वतःला ते दूर ठेवत आहेत. अशा प्रकारची विधानं ही राष्ट्रीय सुरक्षा कमजोर करते तसंच सैन्य दलांचा अवमान करतात. राहुल गांधी हे स्वतःच स्वतःची राजकीय कबर खोदत आहेत. तसंच भारताच्या अखंडतेच्या मुल्यांपासून स्वतःला दूर नेत आहेत, असंही मोदी यावेळी म्हणाले.

Pm Modi and Rahul Gandhi
Umesh Patil : आमदारकीची हौस लय भारी; राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षाच्या गाडीवर आमदारकीचा लोगो असलेले स्टिकर!

यावेळी ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवमध्ये भारतीय सैन्यानं केलेल्या शौर्याच्या कामगिरीच्या अभिनंदनाचा ठराव पास करण्यात आला. यावेळी पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या २६ नागरिकांची देखील आठवण काढली गेली. तसंच मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवायांच्या कौतुकाचाही या ठरावात समावेश करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com