
Bihar Politics : बिहारमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी बिहारचा दौरा करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांनाही अप्रत्यक्षपणे सावध केले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लाडका मुख्यमंत्री म्हणत मोदींनी सूचक संदेशही दिला आहे.
बिहारमध्ये एनडीएची सत्ता असली तरी आगामी विधानसभा निवडणुकीत कुणाच्या नेतृत्वाखाली लढायची, यावरून अंतर्गत मतभेद अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. भाजपच्या काही नेत्यांनी स्वबळाची भाषा सुरू केली होती. त्यामुळे भाजप आणि नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दलामध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे.
यापार्श्वभूमीवर सोमवारी पंतप्रधान बिहारच्या दौऱ्यावर होते. भागलपूरमध्ये आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी नितीश कुमार हजर होते. त्यानंतर तोन्ही नेत्यांचा रोड शो झाला. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते व उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे दोघेही नव्हते. दोघेही कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते. यावरून आता राज्यातील राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
कार्यक्रमात बोलतानाही पंतप्रधान मोदींनी नितीश कुमारांचा उल्लेख लाडका मुख्यमंत्री असा केला. पंतप्रधानांची ही कृती भाजपला सूचक संदेश देणारी आहे. नितीश कुमार यांच्याविरोधात न बोलण्याची ताकीदच एकप्रकारे मोदींनी दिली आहे. आगामी निवडणूक नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली लढली जाणार का, याबाबत मात्र अजूनही संभ्रम कायम आहे.
हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपने मोठा विजय मिळवला होता. दोन्ही राज्यांत भाजपने पंतप्रधान मोदींचा चेहरा पुढे करत निवडणूक लढवली. आता बिहारमध्येही मोदींच्या नावावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा भाजपचा प्लॅन दिसतो. मात्र, त्यामध्ये नितीश कुमार अडथळा ठरू शकतात. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी नितीश कुमार यांना अधिक जवळ करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.
केंद्रातही नितीश कुमार यांच्या पाठिंब्यामुळे सरकार भक्कम स्थितीत आहे. त्यामुळे त्यांना दुखावणे भाजपला महागात पडू शकते. ही रिस्क भाजप घेणार नाही, याबाबत खुद्द मोदींनीच सूचक संदेश देत भाजप नेत्यांना दिला आहे. सध्यातरी भाजप नितीश कुमार यांना गोंजारत असल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.