Women Reservation : महिला आरक्षणावरून भिडले, पण बंगालमध्ये किती उमेदवार? भाजपसह सर्व पक्षांची यादीच आली समोर…

West Bengal elections women candidates : पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेसची सत्ता असून ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहे. त्यांच्या कार्यकाळात पक्षाने सातत्याने अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला आहे.
Women candidates (AI Image)
Women candidates (AI Image)Sarkarnama
Published on
Updated on

BJP women candidates : महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने उभे ठाकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांनी महिला आऱक्षणाची भ्रूणहत्या केल्याची जोरदार टीका काल केली. तर आज त्यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन तृणमूल काँग्रेसवर हल्ला चढविला. पंतप्रधान मोदी महिला आरक्षणावरून टीका करत असतानाच बंगाल विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने किती महिलांना उमेदवारी दिली आहे, याची माहिती समोर आली आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागांसाठी २३ एप्रिल आणि २९ एप्रिल अशा दोन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. यापार्श्वभूमीवर संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये केंद्र सरकारने आणलेल्या महिला आरक्षण विधेयकाशी संबंधित घटनादुरूस्ती विधेयकाला महत्व प्राप्त झाले होते. पण विरोधकांनी त्याविरोधात मतदान केल्याने विधेयक पारीत होऊ शकले नाही. आता पंतप्रधानांसह एनडीएकडून विरोधकांवर महिलाविरोधी असल्याचा ठपका ठेवला जात आहे.

पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेसची सत्ता असून ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहे. त्यांच्या कार्यकाळात पक्षाने सातत्याने अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला आहे. या विधानसभा निवडणुकीत ममतादीदींनी एकूण २९१ उमेदवारांपैकी ५२ महिलांना उमेदवारी दिली आहे. राज्यातील इतर कोणत्याही पक्षाच्या तुलनेत हा सर्वाधिक आकडा आहे. हे प्रमाण २७ टक्के एवढे आहे.

Women candidates (AI Image)
PM Modi speech : मोठी घडामोड : पंतप्रधान मोदींचे भाषण वादात; निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागले लक्ष

काँग्रेसने मागील काही वर्षांनंतर पहिल्यांदाच सर्व २९४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यामध्ये ३५ महिलांचा समावेश आहे. हे प्रमाण १२ टक्के एवढे आहे. राज्यात काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर महिला आरक्षणावरून विरोधकांना धारेवर धरणारा भाजप तिसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपने ३३ महिलांना उमेदवारी दिली आहे. हे प्रमाण केवळ ११ टक्के एवढे आहे.

Women candidates (AI Image)
IAS couple in Maharashtra : IAS पत्नीसाठी पतीने बदलले केडर; आता महाराष्ट्रातील एका जिल्ह्याचा कारभार या जोडीच्या खांद्यावर...

पश्चिम बंगालमधील खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेतील सध्याच्या महिलांच्या आकडेवारीवरून भाजपला घेरले आहे. लोकसभेत भाजपचे २४० खासदार असून त्यामध्ये ३१ महिला खासदार आहे. तर काँग्रेसच्या ९८ खासदारांपैकी १४ महिला आहेत. तृणमूल काँग्रेसचे २९ खासदार असून त्यात ११ महिला आहेत. पक्षनिहाय एकूण खासदारांच्या तुलनेत महिला खासदारांची सर्वाधिक टक्केवारी तृणमूल काँग्रेसची आहे. तर भाजप सर्वात मागे असल्याचे महुआ मोईत्रा यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com