Shri Ram Son Samadhi : श्रीरामांचे पुत्र लव यांची पाकिस्तानात समाधी; काँग्रेस नेत्यानं दिली महत्वाची माहिती...

Pakistan News Congress Leader Rajiv Shukla : प्रभू श्रीराम यांचे पुत्र लव यांची समाधी लाहोर येथे आहे. तर कुश यांची समाधी कसूर शहरात असल्याची माहिती शुक्ला यांनी दिली आहे.
Shri Ram Son Samadhi
Shri Ram Son SamadhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : प्रभु श्रीराम यांचे पुत्र लव यांची पाकिस्तानात समाधी असून त्याबाबत काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियात पोस्ट केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुक्ला हे पाकिस्तानच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी समाधीला भेट देत महत्वाची माहिती समोर आणली आहे.

प्रभू श्रीराम यांचे पुत्र लव यांची समाधी लाहोर येथे आहे अशी माहिती शुक्ला यांनी दिली आहे. तसेच त्याचे फोटोही सोशल मीडियात पोस्ट केले आहेत. लव यांच्या समाधीचा जीर्णोध्दार केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानातील माजी मुख्यमंत्रीच हा जीर्णोध्दार करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Shri Ram Son Samadhi
Anjali Damania News : दमानियांचा इशारा अन् फडणवीसांचा मेसेज; लगेच घेतली माघार, काय सांगितलं? 

राजीव शुक्ला यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, लाहोरमधील प्राचीन किल्यात प्रभु रामांचे पुत्र लव यांची प्राचीन समाधी आहे. लाहोर नावही त्यांच्याच नावावरून पडले आहे. तिथे प्रार्थना करण्याची संधी मिळाली. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी हे याच समाधीचा जीर्णोध्दार करत आहेत. मोहसिन यांनी मुख्यमंत्री असताना हे काम सुरू केले होते.

आणखी एका पोस्टमध्ये राजीव शुक्ला यांनी लाहोर नगरपालिकेच्या रेकॉर्डचाही दाखला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, लाहोरमधील म्युनिसिपलमध्ये असलेल्या रेकॉर्डनुसार या शहराचे नाव भगवान रामांचे पुत्र लव यांच्या नावावर वसवण्यात आले होते. कसूर शहर हे श्रीरामांचे पुत्र कुश यांच्या नावावर वसवण्यात आले. पाकिस्तान सरकारलाही ही मान्य आहे, असा दावा शुक्ला यांनी केला आहे.

Shri Ram Son Samadhi
Shivshahi Bus Incident : संतापजनक! पुण्यानंतर सांगलीत शिवशाही बसमध्ये मुलीचा विनयभंग

राजीव शुक्ला हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत. ते मुळचे उत्तर प्रदेशातील कानपूरचे आहेत. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाचे ते उपाध्यक्षही आहेत. त्यामुळे ते चॅम्पियन्स ट्रॉपीसाठी पाकिस्तानात गेले होते. युपीए सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री होते. तसेच काँग्रसेच्या कार्यकारिणीचे सदस्यही आहेत.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com