भाजपच्या प्रवक्त्या अडचणीत! पोलिसांकडे आणखी एक तक्रार दाखल

वादग्रस्त वक्तव्य करणं चांगलंच भोवलं
Nupur Sharma
Nupur SharmaSarkarnama

नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यामुळं भाजपच्या (BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) या अडचणीत आल्या आहेत. प्रेषित महंमद पैगंबर व इस्लाम धर्म यांच्याबद्दल कथितरीत्या अपशब्द वापरल्याबद्दल त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या मिळत असल्याची तक्रार शर्मांनी पुन्हा केली आहे. याचवेळी शर्मा यांच्याविरूध्द पोलिसांकडे (Police) आणखी एक तक्रार दाखल झाली आहे.

ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर एका खासगी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान शर्मा यांनी प्रेषित पैगंबरांबद्दल अनुदार उद्घार काढल्याचा आरोप आहे. शर्मांनी मात्र, माझे शब्द काटछाट करून विकृत पध्दतीने समाज माध्यमांवर ट्विट करण्यात आल्याचा दावा केला आहे. याबाबत त्यांनी फॅक्ट चेकर महंमद जुबैर यांना दोषी धरले आहे. जुबैर यांनी माझे म्हणणे काटछाट करून समाज माध्यमांवर पसरवले, असा आरोप शर्मांनी केला आहे.

जुबैर यांनी शर्मांचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. जुबैर चालवत असलेल्या आल्ट न्यूजच्या माध्यमातून माझ्याविरूध्द सातत्याने विरोधात माहिती पसरवली जात आहे, असे शर्मांनी म्हटले आहे. हा वाद सुरू झाल्यापासून मला, माझ्या बहिणीला आणि आई-वडिलांना शिरच्छेदाच्या व बलात्कार करून ठार मारण्याच्या धमक्या मिळत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी त्यांनी दिल्ली पोलिसांकडे पुन्हा तक्रारही दाखल केली आहे.

Nupur Sharma
काँग्रेसला धक्का! पक्ष सोडल्यानंतर 15 दिवसांतच बडा नेता भाजपच्या तंबूत दाखल

माझ्या व कुटुंबीयांच्या जिवाला काही धोका झाल्यास जुबैर हेच जबाबदार असतील, असे शर्मांनी पोलिसांकडे दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे. याबाबत आजपर्यंतचे कॉलचे तपशील व मेसेजेही त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. शर्मा यांच्याविरूध्द रझा अकादमीसह हैदराबाद व इतर ठिकाणच्या काही धार्मिक संघटनांनीही पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.

Nupur Sharma
सलमान खान 'टार्गेट'वर? सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर सुरक्षा वाढवली

शर्मांना मिळणाऱया धमक्यांचे पुरावे मिळताच दिल्ली पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. शर्मा व कुटुंबीयांना अद्याप पोलिस संरक्षण देण्यात आलेले नाही. सायबर शाखेच्या अहवालानंतर दिल्ली पोलीस त्यांना सुरक्षा पुरवू शकतात. भाजपने शर्मा यांच्या पाठीशी उभी राहण्याची भूमिका घेतली असून, त्यांचे समर्थन केले आहे. देश राज्यघटनेनुसार चालतो आणि कुणालाही शिरच्छेदाचा फतवा काढण्याचा अधिकार नाही, असे भाजपने म्हटले आहे. शर्मा यांच्याविरूध्द पोलिसांकडे तक्रारी करण्याचा मार्ग खुला असल्याचेही भाजपने स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com