

Pradeep Gupta News : लोकसभा निवडणुकीसाठी अजून तीन वर्षांचा कालवाधी बाकी आहे. मात्र, भाजपने आत्तापासून निवडणुकीची तयारी सुरू केल्याच्या चर्चा आहे. इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत पुढे असणाऱ्या भाजपच्या या तयारीनंतर भाजप आणखी किती काळ सत्तेत राहणार याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
राजकीय विश्लेषक आणि एक्सिस माय इंडियाचे प्रमुख प्रदीप गुप्ता यांनी भाजप किती काळ सत्तेत राहणार याचे उत्तर एका मुलाखतीमध्ये दिले आहे. प्रदीप गुप्ता हे अचूक राजकीय अंदाज वर्तवण्यासाठी ओळखले जातात. तमिळनाडूमध्ये अभिनेता विजय सत्तेत येईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. याआधी देखील त्यांनी वर्तवलेले अनेक अंदाज खरे ठरले आहे.
गुप्ता म्हणाले की, जोपर्यंत केंद्रातील विद्यमान सरकारच्या कामगिरीमध्ये मोठी पडझड होत नाही. तोपर्यंत भाजप सत्तेत टिकून राहील. किती वर्ष भाजप सत्तेत राहील याचा अंदाज वर्तवताना ते म्हणाले, ‘2014 मध्ये देशाची सत्ता त्यांच्याकडे आली. भाजपचे राजकीय प्रभुत्व हे 20 वर्ष चालेल.
एनडीए आणि विरोधी पक्ष यांचे दोघांचे भविष्य सरकारच्या कामगिरीवर अवलंबून आहे. मोठे बहुमत मिळाल्याने भाजपविषयीच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत. त्यामुळे भाजपला आता सुपर परफॉर्म कराव लागेल. जोपर्यंत त्यांची कामगिरी खराब होत नाही तोपर्यंत विरोधकांचा पराभव होत राहणार.
ते म्हणाले, काँग्रेस 1977 पर्यंत सलग सत्तेत राहिली. त्यानंतर त्यांना आव्हानांचा सामना करावा लागला. त्यामुळे आपण 20 वर्षांच्या राजकीय पिढीचा उल्लेख करत होता. 20 वर्षांचे चक्र आत्ता देखील राहणार.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.