Prajwal Revanna : माजी पंतप्रधानांच्या नातवाचा तुरुंगातही कारनामा! फॉरेन्सिक तपासणीत सापडले 245 अश्लील व्हिडिओ

Prajwal Revanna Jail Phone Case : प्रज्वल रेवन्नाच्या बंगळूर सेंट्रल जेलमधील हाय सिक्युरिटी सेलमधून जप्त मोबाइल आणि पेनड्राइव्हच्या फॉरेन्सिक तपासणीत 145 हून अधिक अश्लील व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली आहे.
Prajwal Revanna
Prajwal Revannasarkarnama
Published on
Updated on

Prajwal Revanna mobile phone found in jail : लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला माजी खासदार प्रज्वल रेवण्णा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्याच महिन्यात त्याच्या बॅरकमधून मोबाईल फोन, चार्जर, पॉकेट नोटबुक आणि पेनड्राइव्ह जप्त करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे, या पेनड्राइव्हमध्ये ७० हून अधिक अश्लील व्हिडिओ आढळले असल्याची चर्चा होती. पण आता फॉरेन्सिक तपासणी करण्यात आल्यानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, मोबाइल फोनमध्ये तब्बल 145 हून अधिक अश्लील व्हिडिओ क्लिपस आढळून आल्या आहेत. तर पेनड्राइव्हमध्ये देखील 100 हून अधिक अश्लील क्लिप्स असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात गेल्याच महिन्यात रेवण्णा आणि प्रताप रॉय यांच्याविरोधात परप्पन अग्रहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला करण्यात आला होता.

दरम्यान रेवन्नाच्या हाय सेक्युरिटी सेलमधून जप्त करण्यात आलेल्या साहित्यापैकी मोबाइल आणि पेनड्राइव्हची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. ज्यात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच तपासणीत रेवन्ना जेलबाहेरील व्यक्तींशी बोलत होता हे देेखील उघड झाले असून त्या संभाषणांच्या ऑडिओ देखील आढळल्या आहेत. तर तो आपल्या कुटुंबातील सदस्यांसह एका महिला मैत्रिणीशी संपर्कात असल्याचे समोर आले आहे.

Prajwal Revanna
Prajwal Revanna : रेवण्णाचा तुरुंगातही ‘कारनामा’! पेनड्राइव्हमध्ये 70 हून अधिक अश्लील व्हिडिओ; हाय-सिक्युरिटी सेलवर छाप्यात धक्कादायक खुलासा

बंगळुरू शहराचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) यांच्या आदेशानुसार परप्पन अग्रहार केंद्रीय कारागृहात ११ ऑगस्ट रोजी सीसीबीच्या पथकाने झाडाझडती केली होती. दरम्यान सुरक्षा विभाग क्रमांक तीनमधील पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक चारमध्ये मोबाइल फोन, सिमकार्ड, चार्जर आणि एक नोटबुक जप्त करण्यात आला होता.

यावेळी रेवण्णाने नोटबुक आपली असल्याचे सांगत मोबाईलबद्दल हात वर केले होते. तर विचाराधीन कैदी प्रताप रॉयने मोबाईल फोन, चार्जर आणि पेनड्राइव्ह आपले असल्याचे सांगितले होते. पण आता फॉरेन्सिक तपासणी केल्यानंतर समोर आलेल्या डेटाने खळबळ उडवून दिली आहे. मोबाइल फोन आणि पेनड्राइव्हमध्ये तब्बल २४५ हून अधिक अश्लील क्लिप्स आढळल्या आहेत. तर नोटबुकमध्ये सहा ते सात फोन नंबर सापडले आहेत.

Prajwal Revanna
Prajwal Revanna Case : माजी खासदाराविरोधात १३ हजार पानी आरोपपत्र, ३९ जणांविरुद्ध गुन्हे अन् अश्‍लील व्हिडिओसाठी ७० पेनड्राइव्ह...

आता आढळलेल्या नंबरची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार असून संबंधित व्यक्तींना नोटीस बजावली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर मोबाइल फोन जेलमध्ये कसा पोहोचला याचा तपास पोलीस करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com