

प्रज्वल रेवण्णा यांना बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
SIT ने १३,७१२ पानी आरोपपत्र दाखल करत ३९ जणांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत.
तपासात ७० पेनड्राइव्ह खरेदी करून व्हिडिओ प्रसारित केल्याचा धक्कादायक खुलासा झाला.
Bengaluru News : कर्नाटकच्या बंगळुरू येथील जनता दल सेक्युलर पक्षाचे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. फार्म हाऊसमध्ये काम करणाऱ्या महिलेवरील बलात्कारप्रकरणी प्रज्वल रेवण्णावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोठी कारवाई करत १३,७१२ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. तसेच अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणात पेनड्राइव्ह वितरित केल्याप्रकरणी हासन येथील सिव्हिल न्यायालयात प्रज्ज्वल रेवण्णासह एकूण ३९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. एसआयटीने केलेल्या तपासात आरोपींनी अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्यासाठी सुमारे ७० पेनड्राइव्ह खरेदी केल्या केल्याचे उघड झाले आहे. तर धक्कादायक म्हणजे या सर्व पेनड्राइव्हची खरेदी हासनमध्येच केल्याचे स्पष्ट झाले आहे.
हासन जिल्ह्यातील गन्नीकाडा येथील कुटुंबाच्या फार्महाऊसवर घरकाम करणाऱ्या एका 48 वर्षीय महिलेवर रेवण्णाने बलात्कार केल्याचा आरोप संबंधित पीडितेने केला होता. तर 2021 मध्ये रेवण्णाने प्रथम फार्महाऊसवर आणि नंतर बंगळूरुतील त्याच्या घरी तिच्यावर अत्याचार केले. शिवाय, या घटनांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचा दावा पीडितेने केला होता. यानंतर महिलेवरील बलात्कारप्रकरणी प्रज्वल रेवण्णावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने प्रज्ज्वल रेवण्णा यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच त्याला 10 लाख रुपये दंडाची शिक्षा देखील ठोठावण्यात आला.
दरम्यान आता या प्रकरणात नेमलेल्या एसआयटीने अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणात तपास करत धक्कादायक माहिती उघड केली आहे. ज्यात पथकाने पेनड्राइव्ह वितरण प्रकरणात मोठी कारवाई करत १३,७१२ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. तसेच हासन येथील सिव्हिल न्यायालयात प्रज्ज्वल रेवण्णासह एकूण ३९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
या प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोठी कारवाई करत १३,७१२ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. तसेच अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणात पेनड्राइव्ह वितरित केल्याप्रकरणी हासन येथील सिव्हिल न्यायालयात प्रज्ज्वल रेवण्णासह एकूण ३९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. एसआयटीने केलेल्या तपासात आरोपींनी अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्यासाठी सुमारे ७० पेनड्राइव्ह खरेदी केल्या केल्याचे उघड झाले आहे. तर धक्कादायक म्हणजे या सर्व पेनड्राइव्हची खरेदी हासनमध्येच केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात सुरुवातीला ५२ जणांची नावे समोर आली होती. त्यापैकी ३९ जणांविरुद्ध पुरावे सिद्ध झाल्याने त्यांना आरोपी करण्यात आले आहे. वकील पूर्णचंद्र यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी एफआयआर नोंदवला होता. तांत्रिक अहवाल आणि फॉरेन्सिक सायन्स लॅब (एफएसएल) अहवालांच्या आधारे आरोपपत्र तयार केल्याची माहिती पूर्णचंद्र यांनी दिली.
उच्च न्यायालयातही सुनावणी
दरम्यान, घरकाम करणाऱ्या महिलेवरील अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या प्रज्वल रेवण्णा याने डीएनए आणि डिजिटल पुराव्यांच्या नोंदीसंदर्भात दाखल केलेल्या अंतरिम अर्जावर हरकत नोंदवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने एसआयटीला दिले होते. तसेच, स्वतःवरील शिक्षा रद्द करण्यासाठी प्रज्वल रेवण्णा याने दाखल केलेल्या फौजदारी अपिलावर न्यायमूर्ती एच. पी. संदेश आणि टी. वेंकटेश नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
आरोपींची यादी
या प्रकरणात नवीन, कार्तिक एन., चेतन बी. सी., चेतन वाय. एस., लिखित गौडा, देवराजेगौडा, गिरीश एस., योगेश वाय. डी., निशांत, हरीश एस. एन., सुमंत, कृष्णेगौडा, किरण एस. के., शरथ एम. के., तेजस डी. एन., गगनकुमार, रेवंत, शिवप्रसाद, नागेंद्र जैन, वसंतकुमार, समीर अहमद, बालसुब्रह्मण्य, चिरंत, देवराज डी. एच., जयसूर्या, चंद्रशेखर बी. के., कुमार, दिनेश के. के., नवीनकुमार एन. व्ही., प्रशांत बी. एस., अनिल एच. व्ही., हर्षवर्धन एच. एम., अक्षयकुमार, प्रवीणकुमार, हरीश एन. सी., शशांक एच. एम., भरत, चेतनकुमार आणि सोमशेखर के. के. यांचा समावेश आहे.
1. प्रज्वल रेवण्णा यांना कोणती शिक्षा झाली?
त्यांना बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
2. आरोपपत्र किती मोठे आहे?
१३,७१२ पानांचे आरोपपत्र SIT ने सादर केले आहे.
3. किती जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत?
एकूण ३९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
4. तपासात काय उघड झाले?
७० पेनड्राइव्ह खरेदी करून व्हिडिओ प्रसारित केल्याचे उघड झाले.
5. हे प्रकरण कुठे चालू आहे?
हासन येथील सिव्हिल न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.