Prashant Kishor : "भाजपची जबाबदारी फक्त गुजरातसाठी, बिहार गरीब...", बांकीपूरमधील विजयानंतर प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया

Prashant Kishor Victory : "पुढील तीन महिन्यांत बांकीपूर मतदारसंघात बदल दिसून येईल. आमच्याकडे कोणतेही राजकीय बळ नसतानाही आम्ही बिहारच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवत होतो. आता आमच्याकडे जनतेने निवडून दिलेला एक आमदार आहे, त्यामुळे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही अधिक ताकदीने काम करू."
Prashant Kishor
Prashant Kishorsarkarnama
Published on
Updated on

Prashant Kishor Victory : बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचा परंपरागत बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

या निकालानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना हा विजय स्वतःचा नसून बिहारमध्ये बदलाची अपेक्षा बाळगणाऱ्या जनतेचा असल्याचे सांगितले. विजयानंतर प्रशांत किशोर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "हा माझा विजय नाही, तर बिहारमध्ये परिवर्तनाची अपेक्षा ठेवणाऱ्या जनतेचा विजय आहे. बिहारला सक्षम आणि प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे.

पुढील तीन महिन्यांत बांकीपूर मतदारसंघात बदल दिसून येईल. आमच्याकडे कोणतेही राजकीय बळ नसतानाही आम्ही बिहारच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवत होतो. आता आमच्याकडे जनतेने निवडून दिलेला एक आमदार आहे, त्यामुळे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही अधिक ताकदीने काम करू."

यावेळी त्यांनी बिहारमधील सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला. "बिहारच्या जनतेने २०२ आमदार निवडून दिले आहेत. मात्र राज्याचे नेतृत्व अशा व्यक्तीकडे जाऊ नये, ज्याच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. बिहारला शिक्षण, रोजगार आणि विकासाला प्राधान्य देणारा मुख्यमंत्री मिळणे आवश्यक आहे," असे ते म्हणाले.

Prashant Kishor
Nashik Politics : नाशिकमध्ये काँग्रेसच्या आंदोलनाला सत्ताधारी नगरसेविकेचा पाठिंबा; भाजपला एकटं पाडलं

प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचाही उल्लेख केला. "सम्राट चौधरी यांनी मला यापूर्वीही भाऊ म्हटले आहे. ही लढाई कोणत्याही एका व्यक्तीविरोधात नाही. बिहारमधील १३ कोटी जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

याचबरोबर त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपवरही टीका केली. "बिहार हा देशातील गरीब राज्यांपैकी एक आहे. बिहारमधील जनता भाजपला मतदान करते, मग केंद्र सरकारची जबाबदारी केवळ गुजरातपुरतीच मर्यादित आहे का? गुजरातमध्ये लाखो कोटी रुपयांची बुलेट ट्रेन उभारली जाते, तर बिहारच्या मुलांसाठी देखील काहीतरी विचार करा," असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

Prashant Kishor
Disability Certificate Scam: बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर सरकारी नोकरी! सोलापूर शासकीय रुग्णालयातील 2 लिपिकांसह 6 जण अटकेत

बांकीपूर पोटनिवडणुकीतील या विजयामुळे जनसुराज पक्षाला मोठे राजकीय बळ मिळाले असून, आगामी बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकालाकडे महत्त्वाच्या राजकीय घडामोडी म्हणून पाहिले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com