Nashik Politics : नाशिकमध्ये काँग्रेसच्या आंदोलनाला सत्ताधारी नगरसेविकेचा पाठिंबा; भाजपला एकटं पाडलं

Nashik Congress protest : राज्य विधिमंडळ असो वा महापालिका भाजपने जो जो विरोधक असेल त्याला साम दाम दंड भेद नीतीने भाजपकडे वळवले. त्यातून राजकीय कोंडी आणि अस्वस्थता कशी निर्माण होते हे शहरात पाहायला मिळत आहे. शहरातील खड्डे त्याला निमित्त ठरले आहेत.
Nashik Potholes Protest | Shiv Sena Corporator | Congress
Nashik Potholes Protest | Shiv Sena Corporator | CongressSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 04 Aug : नाशिक शहरातील खड्डे हा केवळ आंदोलनाचा विषय राहिलेला नाही. भाजपने जमवलेल्या अन्य पक्षांच्या नेत्यांची घालमेल आणि अस्वस्थतेचे प्रतीक बनला आहे. सत्ताधारी भाजप यामध्ये एकटा पडल्याचे चित्र आहे.

राज्य विधिमंडळ असो वा महापालिका भाजपने जो जो विरोधक असेल त्याला साम दाम दंड भेद नीतीने भाजपकडे वळवले. त्यातून राजकीय कोंडी आणि अस्वस्थता कशी निर्माण होते हे शहरात पाहायला मिळत आहे. शहरातील खड्डे त्याला निमित्त ठरले आहेत.

सोमवारी काँग्रेस शहराध्यक्ष निलेश खैरे यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन झाले. महापालिकेच्या प्रवेशद्वारावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत प्रशासनाचे पितळ उघडे पाडले. तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

Nashik Potholes Protest | Shiv Sena Corporator | Congress
BJP Banner : 'शासकीय कार्यालयात राजकीय फलक कशाला?' मिनी मंत्रालयात भाजपची बॅनरबाजी अंबादास दानवेंना खटकली!

महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन झाले. यावेळी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील तिथे आल्या. निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आश्चर्य वाटले.

सत्ताधारी डॉ. पाटील यांनी यापूर्वीच शहरातील खड्डे आणि प्रदूषणाच्या विषयावर प्रशासनाला धारेवर धरले होते. काँग्रेसचे आंदोलन सुरू असताना त्या थेट व्यासपीठावर गेल्या. खड्डे आणि नादुरुस्त रस्ते यामुळे नागरिकांच्या व्यथा त्यांनी मांडल्या. सत्ताधारी नगरसेविकाच विरोधकांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे चित्र दिसले.

Nashik Potholes Protest | Shiv Sena Corporator | Congress
Konkan Politics : उदय सामंतांच्या बालेकिल्ल्यात भाजपची मोर्चेबांधणी; नेत्यांच्या सलग दौऱ्यांमुळे चर्चेला उधाण, बड्या नेत्याचेही राजकीय संकेत

नाशिक महापालिकेत भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही सत्तेत आहे. भाजपचा महापौर तर शिवसेनेचा उपमहापौर आहे. जनतेतील रोष लक्षात आल्यावर महापौर, उपमहापौर देखील रस्त्यावर उतरले होते.

आता सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका डॉ. पाटील या चक्क काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी झाल्या. त्यामुळे भाजपने विविध मार्गांचा उपयोग करून निवडणुकीआधी जमा केलेले विविध विचारांच्या पक्षांचे लोक सत्तेत असूनही अस्वस्थ असल्याचे चित्र आहे. त्यात गैरकारभाराचा भागीदार एकटा भाजप ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com