

Prashant Kishor: जनसुराज पार्टीचे प्रमुख प्रशांत किशोर हे बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत विजयी झाले आहेत. भाजपसाठी हा मोठा झटका आहे कारण हा भाजपचा बालेकिक्ला असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे याच मतदारसंघातून आमदार झाले होते. पण आता इथून विजयानंतर पहिल्यांदाच आमदारकीची माळ गळ्यात पडल्यानंतर प्रशांत किशोर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यातून त्यांनी भाजपवर बोचऱ्या शब्दांत टीका केली.
माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना किशोर म्हणाले, हा बांकीपूरच्या जनतेचा विजय आहे. जसं की निवडणूक प्रचारावेळी आम्ही म्हटलं होतं, ही निवडणूक आमदार बनवणारी निवडणूक नाही तर ही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला हा संदेश देण्याचा प्रयत्न आहे बिहारच्या जनतेकडून. बिहारमध्ये एखाद्या चांगल्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवा, जनतेनं तुम्हाला २०२ आमदार निवडून दिले आहेत. कोणत्याही गुन्हेगार, चारित्र्यहीन माणसाकडं बिहारचं नेतृत्व देऊ नका, चांगल्या माणसाकडं नेतृत्व द्या.
कारण बिहारमध्ये देखील शिक्षण असावं, बिहारमध्येही मुलांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा, बिहारच्या मुलांना बाहेर मजुरी करायला जावं लागू नये, हा संदेश बांकीपूरच्या लोकांनी दिला आहे. बाकी आमदार जिंकणं हारणं हे राजकारण आहे हे तर सुरुच राहील. ज्यांनी मला मतदान केलं त्यांचे धन्यवाद देतो आणि ज्यांनी मतदान केलं नाही त्यांना हेच सांगेन की तुमचा विश्वास जिंकण्यासाठी आणखी प्रयत्न करेन. पण महत्वाची गोष्ट अशी की बिहारला चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. बिहारमध्ये सुधारणा व्हायला हवी. मोदींना, भाजपला, अमित शहांनी हे पाहिलं पाहिजे की बिहारमध्ये चांगल्या सुविधा कशा निर्माण होतील. बिहारमध्ये रोजगार कसे निर्माण होतील, इथल्या तरुणांचं पलायन कसं बंद होईल, हाच एकमेव उद्देश आहे.
आम्हाला आमदार होऊन ठेका-पट्टा करायचा नाही. बिहारमध्ये पाच किलो धान्याच्या नावानं, जातीच्या नावानं मत मागितली जाऊ नयेत. जर मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी गुजरातच्या लोकांनी ३५ खासदार निवडून देऊन योगदान दिलं आहे तर बिहारच्याही १३ कोटी लोकांनी डोळे झाकून मोदींना मतदान केलं आहे. त्यामुळं जेवढी चिंता त्यांना गुजरातची आहे त्यापेक्षा थोडीशी चिंता त्यांनी बिहारच्या जनतेची देखील करायला हवी. बिहारसाठी मोदींनी विशेष कार्यक्रमाची आखणी केली पाहिजे कारण बिहारमधून पलायन कमी व्हावं. कोणत्या मुलानं केवळ १० ते १५ रुपयांसाठी आपलं घर-कुटुंब, समाजाला सोडून गुजरात, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, कोईम्बतूर, तामिळनाडू, कर्नाटकला जावं लागू नये. याच उद्देशानं आम्ही इथं आलो आहोत, आजचा विजय याच गोष्टीला मजबूत करण्यासाठी आहे.
त्यामुळं ज्या बिहारच्या लोकांनी भाजपला जिंकून दिलं आहे त्यामुळं भाजपच्या नेतृत्वाची ही जबाबदारी आहे की, त्यांनी अशा व्यक्तीला बिहारचा मुख्यमंत्री बनवावं ज्यानं बिहारमध्ये रोजगार, शिक्षणाची स्थिती सुधारावी, भ्रष्टाचार कमी व्हावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पलायन बंद व्हावं. हा थेट संदेश बिहारच्या जनतेनं दिला आहे त्यामुळं ३० वर्षांचा गड केवळ ३० दिवसांत ढासाळला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.