

Monsoon Session News : सत्तासंघर्षातून नेहमीच एकमेकांवर (पक्षीय पातळीवर) आसूड ओढणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) संसदेत समोरसमोर आले. तेव्हा दोघेही काही मिनिटे थांबून नमस्कार केला आणि विचारपूसही केली. मोदी आणि सोनिया गांधी यांची ही भेट साऱ्यांच्या नजरेत आली त्यांची चर्चाही रंगली. या दोघांच्या चर्चेत लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजनही उपस्थित होत्या. (Latest Marathi News)
सभागृहाची बैठक सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी पंतप्रधान मोदींनी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या गॅलरीत जाऊन नेत्यांचे स्वागत केले. विरोधी नेते उपस्थित असलेल्या गॅलरीजवळ पोहोचल्यावर त्यांनी सोनिया गांधींशी संवाद साधला. दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सत्ताधाऱ्यांवर विरोधक पक्षांनी विविध मुद्द्यांवर धारेवर धरले आहे. मणिपूर घटनेवरून संसदेतील वातावरण तापलेले आहे. असे असतानाही सोनिया गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेट घडून आली.
अधिवेशनाच्या निमित्ताने संसदेच्या आवारात ही या दोन्ही नेत्यांची सहजरित्या भेट झाली असली तरी, या दोघांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याकडे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दोघांच्या भेटीत अधिवेशनातील काही मुद्द्यावर चर्चा झाली का? पक्षीय राजकारणाची चर्चा घडून आली का? अशा चर्चांना उधाणा आले आहे. (Latest Marathi News)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.