New Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या हटके वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाने नेहमीच चर्चेत असतात. आताही त्यांनी आपल्या खासदारांना एक आपुलकीचा सल्ला दिला आहे. मला सर्वजण आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच मानतात. त्यामुळे सर्वांनी माझा उल्लेख केवळ मोदी या नावानेच करावा, माझ्या नावापुढे आदरणीय लावू नका किंवा मोदीजी म्हणू नका, असा सल्ला पंतप्रधान मोदींनी आपल्या खासदारांना दिला आहे.
नुकत्याच देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. यामध्ये तीन राज्यांत भाजपला सत्ता मिळाली तर दोन राज्यांत चांगली कामगिरी साध्य करता आली. या विजयाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी संसदेत भाजप खासदारांकडून पंतप्रधान मोदींच्या सन्मानाचा कार्यक्रम पार पडला.
या वेळी खासदारांनी कार्यक्रमस्थळी मोदीजी मोदीजी या नावाने घोषणाबाजी केली. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीदेखील आदरणीय मोदीजी म्हणत त्यांचे स्वागत केले होते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आपल्या कार्यकर्त्यांना आणि सदस्यांना मोदी या नावासोबत कोणतेही विशेषण न लावण्याचा सल्ला दिला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, मीही एक पक्षाचा कार्यकर्ताच आहे. त्यामुळे आपला पक्ष म्हणजे एक कुटुंब आहे. त्यामुळे माझ्या नावापुढे कोणतीही विशेषणे लावू नका, मला मोदीजी, आदरणीय मोदीजी म्हणू नका. जनता मला मोदी या नावानेच ओळखत असून, मला फक्त मोदीच म्हणा. तसेच जनता मला आपल्या कुटुंबातील सदस्य मानत असल्याचे त्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या कार्यक्रमात त्यांनी भाजप नेत्यांसोबत कार्यकर्त्यांनाही महत्त्वाचा सल्ला दिला. ते म्हणाले, आदरणीय किंवा मोदीजी अशा प्रकारच्या विशेषण आणि उपाध्यांमुळे आपल्यातील दुरावा वाढतो. म्हणून यापुढे माझ्या नावाचा उल्लेख फक्त मोदी असाच करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. या वेळी सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात मोदींच्या मोठेपणाला दाद देत त्यांचे कौतुक केले.
दरम्यान, भाजपने (BJP) लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात आपली सत्ता कायम राखली आहे, तर छत्तीसगड, राजस्थान या राज्यांत काँग्रेसकडून सत्ता खेचून आणली आहे. तसेच तेलंगणातही या निवडणुकीत चांगली कामगिरी करत 8 जागांवर विजय मिळवला आहे. या ठिकाणी कामारेड्डी मतदारसंघात भाजपचे उमेदवार कटिपल्ली वेंकट रमण रेड्डी यांनी आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव केला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.