Solapur Politic's : प्रणिती शिंदेंना सोलापुरात धक्का; कट्टर समर्थकाने सोडली साथ

Congress's Former Corporator Will Join BJP : येमूल हे गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेसमध्ये अस्वस्थ होते, अशी चर्चा आहे.
Congress's Former Corporator Will Join BJP
Congress's Former Corporator Will Join BJPSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून चर्चेत असलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांना आज (ता. ७ डिसेंबर) मोठा धक्का बसला आहे. आमदार यांचे कट्टर समर्थक आणि माजी नगरसेवक मेघनाथ येमूल यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिंदे एकीकडे लोकसभेसाठी डावपेच आखत असताना येमूल यांनी पक्ष सोडणे शिंदेंसाठी निश्चितच झटका मानला जात आहे. (Praniti Shinde's supporter, former corporator Meghnath Yemul will join BJP)

माजी नगरसेवक मेघनाथ येमूल हे प्रणिती शिंदे निवडणूक लढविणाऱ्या सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील कट्टर समर्थकाने भारतीय जनता पक्षात प्रवेश करणे, हे काँग्रेस आणि प्रणिती शिंदे यांच्यासाठी धक्कादायक मानले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress's Former Corporator Will Join BJP
Ravikant Tupkar News : 'आता गनिमी काव्याने सरकारच्या बुडाखाली आग लावू...'

सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील प्रभाग नऊमधून गेल्या निवडणुकीत श्रीनिवास येमूल हे पराभूत झाले होते. सात वर्षांनंतरही या प्रभागात भाजपचा बोलबोला असल्याचे सांगितले जाते. तसेच, नुकतेच तीन राज्यांत मिळालेल्या यशामुळे भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. त्यातूनच भविष्यातील राजकीय वाटचाल सुकर करण्याच्या दृष्टीने येमूल यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

येमूल हे गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेसमध्ये अस्वस्थ होते, अशी चर्चा आहे. त्यातूनच गणेशोत्सवाच्या काळात त्यांनी सोलापूरचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना श्री गणेशाच्या पूजेसाठी घरी बोलावले होते. येमूल यांच्या निमंत्रणामुळे देशमुख यांनी येमूल यांच्या घरी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले होते. त्यावेळी येमूल हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, येमूल यांनी त्याचा इन्कार करत आपण कुठेही जाणार नाही, असे स्पष्ट केले होते.

देशमुख यांनी भेट दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदार प्रणिती शिंदे यांनी येमूल यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून ते शांत होते. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीतच येमूल यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार होता. मात्र, बावनकुळे यांचा दौरा रद्द झाल्याने आज भाजपचे सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या उपस्थितीत येमूल यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला.

Congress's Former Corporator Will Join BJP
Maharashtra Winter Session : कैलास गोरंट्याल विधानसभेत उद्या बॉम्ब फोडणार; मित्र म्हणत कोणाला दिला इशारा...

येत्या काही दिवसांत प्रदेश पदाधिकारी, खासदार आणि आमदारांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक श्रीनिवास येमूल यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे. मेघनाथ येमूल यांचा भाजप प्रवेश म्हणजे घरवापसी आहे, असेही नरेंद्र काळे यांनी या वेळी स्पष्ट केले.

Congress's Former Corporator Will Join BJP
Winter Session 2023 : ‘ओ..ऽ लंडन रिटर्न दानवे,’ म्हणत संजय शिरसाटांनी काढला चिमटा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com