Shiv Sena MLA Disqualification : ठाकरेंच्या वकिलांनी अखेर भात्यातील बाण काढलाच; शिंदेंच्या मोहऱ्याला 'त्या' प्रश्नानं टिपलं

Winter Session News : शिवसेना ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामतांकडून शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी सुरू...
Shiv Sena MLA Disqualification Case
Shiv Sena MLA Disqualification CaseSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी राजकीय वातावरण चांगलंच तापवलं आहे. त्याचवेळी विधिमंडळाच्या अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षांसमोरील शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीला सुरुवात झाली.

शिवसेना ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंची उलटतपासणी पार पडल्यानंतर आता शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी सुरू झाली आहे. त्यात ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांनी पहिल्याच दिवशी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडेंना कोंडीत पकडण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात केला.

Shiv Sena MLA Disqualification Case
Ravikant Tupkar News : 'आता गनिमी काव्याने सरकारच्या बुडाखाली आग लावू...'

आमदार अपात्रता प्रकरणात दिरंगाईप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारले होते. तसेच 31 डिसेंबरपर्यंत अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर या प्रकरणाच्या सुनावणीला वेग आला असून, आता मॅरेथॉन सुनावणी पार पडत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता हिवाळी अधिवेशन कालावधीतदेखील आमदार अपात्रतेवर सुनावणी होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे वकील अॅड. देवदत्त कामत यांच्याकडून शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी सुरू झाली आहे.(Shivsena Mla Disqualification)

ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आमदार लांडेंना आपण शिवसेना पक्षाचे कधीपासून सदस्य आहात, असा अडचणीत टाकणारा सवाल विचारला. यावर लांडे काय उत्तर देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले, पण लांडेंनी मुंबईत आल्यापासून अर्थातच 1984-85 पासून आपण शिवसेनेचे सदस्य असल्याचे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याच प्रश्नाला अनुसरून पुन्हा वकील कामतांनी तुम्ही शिवसेनेचे सदस्यत्व सोडून देईल अशी कुठलीही कृती केलेली नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांने चालत आहे, असं आपण सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील परिच्छेद 11 मध्ये नमूद केले आहेत. तसेच पक्षाने निर्देश दिले त्यांच्याविरोधात काम केले नाही असंही म्हटलं आहे, पण तुम्ही पक्षाच्या विचारधारेनुसार काम करत असाल तर 2005 ला बाळासाहेब जिवंत असताना पक्ष का सोडला असा सवाल केला. हा सवाल लांडेंची कसोटी पाहणार होता.

कामतांच्या प्रश्नाला उत्तर देताना लांडे म्हणाले, दिलीप लांडे : मी तुमच्यासमोर जी साक्ष दिली आहे, ती वस्तुस्थितीवर दिली आहे. त्यात पूर्वीची वस्तुस्थिती मांडलेली नाही. त्यामुळे आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी आणि त्यांनी दिलेली शिकवण आचरणात आणण्यासाठी त्या परिच्छेदात ते उत्तर दिल्याचे सांगितले.

Shiv Sena MLA Disqualification Case
Nagpur Winter Session : भरतशेठ, मंत्रिपद मिळत नसलं तरी कोट घाला; वैभव नाईकांनी गोगावले, शिरसाटांना डिवचलं

अॅड. देवदत्त कामतांनी आपण पिटीशन क्रमांक 1 ते 16 मध्ये जी साक्ष दिली ती आपण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वतीने देत आहात, की स्वतः देत आहात, असाही प्रश्न विचारला. त्यावर याचिका क्रमांक 1 ते 16 मध्ये माझे नाव नाही असे आपण मला सांगितले, पण जी सत्य परिस्थिती लोकांसमोर आणि न्यायालयासमोर यावी यासाठी ही साक्ष मी देत आहे. ही साक्ष मी एकनाथ शिंदे यांच्या वतीने नाही तर स्वतःच्या वतीने देत आहे. तसेच कामतांच्या शिंदेंचा भाजपसोबत सत्ता स्थापनेचा निर्णय योग्य होता का ? या सवालावर लांडे म्हणाले, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिंदेंनी भाजपसोबत केलेली युती योग्यच असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हयात असताना तुम्ही शिवसेना राजकीय पक्ष सोडतानाच मनसे पक्षात प्रवेश केला. यावर तुमचं काय म्हणणं आहे ? असा सवाल कामतांनी केला. त्यावर लांडे म्हणाले, यावर काहीही बोलायचे नसल्याचे उत्तर दिल्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

(Edited By Deepak Kulkarni)

Shiv Sena MLA Disqualification Case
CM Revanth Reddy : मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच रेवंथ रेड्डींनी घेतले दोन धडाकेबाज निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com