Action Against RSS : 'RSS' विरोधात सरकार काय करणार? कर्नाटक गृहमंत्र्यांनी दिले स्पष्ट संकेत, मोहन भागवत यांचाही केला उल्लेख

Congress leader and Home Minister Priyank Kharge Statement On RSS : राज्याच्या शेजारील राज्य असणाऱ्या कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असून येथे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे. याबाबत स्पष्ट संकेत गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी दिले आहेत.
RSS
RSSSarkarnama
Published on
Updated on

karnataka Congress Government News : सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात (आरएसएस) कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करणार असल्याचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी शनिवारी स्पष्ट केले. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी आरएसएसची स्थापना, कार्यपद्धती आणि गेल्या १०० वर्षांचा इतिहास याचा अभ्यास करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना खर्गे म्हणाले, ‘आरएसएसला कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी आम्ही योग्य ती पावले उचलू. आम्ही जे काही करू, ते पूर्णपणे कायदेशीर चौकटीतच असेल.’ आरएसएसच्या नोंदणीसह विविध मुद्द्यांवर संघप्रमुख मोहन भागवत यांना आपण लिहिलेल्या पत्राला अद्याप उत्तर मिळाले आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर खर्गे म्हणाले, ‘त्यांच्याकडून उत्तर येईल, अशी मला अपेक्षाच नव्हती. आपण हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळू, असे मी आधीच सांगितले होते.’

खर्गे यांनी सांगितले की, आरएसएस विषयीचा मुद्दा उपस्थित करून सुमारे दीड महिना झाला आहे. पुढील कारवाई करण्यापूर्वी संघटनेचा सुमारे १०० वर्षांचा इतिहास समजून घेण्यासाठी सरकारला वेळ लागणार आहे. मोहन भागवत यांच्यावर टीका करताना खर्गे यांनी अलीकडेच भागवत यांनी काही ‘जेन-झी’ तरुणांची भेट घेतल्याचा उल्लेख केला. विद्यार्थ्यांवरील कारवाईनंतर त्यांना पाठिंबा देण्याच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

RSS
Congress David Dsouza Murder : काँग्रेस नेते डेव्हिड डिसोझा हत्या प्रकरणात शूटर अटकेत; तावडीतून पळताच पोलिसांनी पायावर झाडली गोळी

आरएसएसकडून देशभक्तीची प्रमाणपत्रे देण्याच्या भूमिकेवरही खर्गे यांनी आक्षेप घेतला. ‘आरएसएस स्वतः नोंदणीकृत नाही, मग इतरांना देशभक्तीचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला?’ असा सवाल त्यांनी केला.

‘एखादी व्यक्ती देशभक्त आहे की, देशद्रोही हे ठरवण्याचा अधिकार मला आहे का? मग ते ठरवणारे आरएसएस कोण?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आपल्या पत्राला उत्तर न मिळाल्यास सरकार कोणती कारवाई करणार, असे विचारले असता खर्गे यांनी मात्र कारवाईचे तपशील उघड करण्यास नकार दिला.

RSS
Congress MLA U Turn : मंत्रिपद न मिळाल्याने राजीनामा देणाऱ्या आमदार पाटलांचा यु-टर्न; आमदारकी कायम ठेवण्यासाठी अध्यक्षांना पत्र

‘मी पत्र दिल्यानंतर याबाबत बोलणार असल्याचे आधीच सांगितले आहे. मी आत्ताच सर्व बाबी उघड केल्या, तर त्यांच्यासाठी आश्चर्याचा मुद्दा काय उरेल? कायदेशीर बाबींचाही खुलासा करायचा का?’ असा सवाल खर्गे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

RSS Meeting Controversy; M. M. Kalburgi, Gauri Lankesh
RSS Meeting
Priyank Kharge latest statement on RSS
Court Slams Priyank Kharge
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com