

Punjab News: पंजाबमधील जालंधर येथून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जालंधर येथील रॅलीदरम्यान भाजप नेत्याचा मृत्यू झाला आहे. रजनीश सेहगल असं मृत्यू झालेल्या भाजप नेत्याचं नाव आहे.त्यांची रॅली सुरू असताना अचानक प्रकृती बिघडली.
भाजपकडून पंजाबमध्ये दिवसागणिक मोठ्या प्रमाणात फोफावत चाललेल्या अमली पदार्थविरोधात जालंधर येथे बुधवारी(ता.30 सप्टेंबर)भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मोठी रॅली काढण्यात आली. याच कार्यक्रमासाठी येत असतानाच भाजपच्या नेत्याची अचानक प्रकृती खालावली.
भाजपच्या रॅलीला पोहोचण्यापूर्वीच नेते रजनीश सेहगल यांची अचानक प्रकृती खालावली. त्यांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानं उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखवण्यात आले. मात्र, तीव्र हृदयविकाराचा झटका आला अन् त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपच्या राज्यव्यापी ‘नशामुक्त पंजाब यात्रा’ अभियानाचा हा समारोपाचा जालंधरमधील परागपूर येथे करण्यात आला. या अभियानाची सुरुवात 18 सप्टेंबर रोजी झाली होती. भाजपकडून पंजाबमधील सर्व 117 विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा मार्गक्रमण करत सुमारे 4,000 किलोमीटरचा प्रवास चार वेगवेगळ्या मार्गांवरून करून अखेर जालंधर येथे दाखल झाली होती.
मात्र, भाजप नेते रजनीश सेहगल यांच्या मृत्यूनं पंजाबमधील भाजपच्या या कार्यक्रमावर शोककळा पसरली. यानंतर भाजपचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष केवल सिंह ढिल्लों यांनी नंतर रॅलीच्या व्यासपीठावरून सेहगल यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
ही रॅली जालंधरमधील NH-44 जवळील परागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. पंजाबमधील भाजपच्या राज्यव्यापी ‘नशामुक्त पंजाब यात्रा’ अभियानाचा हा समारोपाचा कार्यक्रम होता. या अभियानाची सुरुवात 18 सप्टेंबर रोजी झाली होती. त्यानंतर पंजाबमधील सर्व 117 विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा मार्गक्रमण करत सुमारे 4,000 किलोमीटरचा प्रवास चार वेगवेगळ्या मार्गांवरून करून अखेर जालंधर येथे पोहोचली.
या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली होती. पंजाबच्या विविध भागांतून हजारो भाजप कार्यकर्ते आणि समर्थक रॅलीला उपस्थित राहणार होते. रॅलीसाठी सुमारे 60 एकर परिसरात व्यवस्था करण्यात आली होती. तसेच विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या समर्थकांसाठी भाजपकडून बस आणि पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.