Assembly Elections : निवडणुकीपूर्वीच राजकीय भूकंप! दुसऱ्या यादीत विद्यमान 8 आमदारांचे तिकीट कापले; दोन खासदारांना विधानसभेची उमेदवारी, कोणाला मिळाली संधी?

Panjab Assembly Elections 2027 News : दुसऱ्या यादीत 8 विद्यमान आमदारांचा पत्ता कट केला असून त्यांच्या जागी नव्या उमेदवारांना संधी दिली. दोन खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
AAP candidate
AAP candidate Sarkarnama
Published on: 
Updated on: 

New dehli News : पंजाबमधील विधानसभा निवडणूक पुढील वर्षाच्या सुरुवातीला होत आहे. या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने आतापासूनच सुरु केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या विरोधात काँग्रेस व भाजप स्वतंत्रपणे लढणार आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीबाबत उत्सुकता शिगेला पोंहचली आहे.

आम आदमी पक्षाने या निवडणुकीसाठी गुरुवारी 31 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करीत जोरदार आघाडी घेतली आहे. यावेळी 8 विद्यमान आमदारांचे तिकीट कापून त्यांच्या जागी नव्या उमेदवारांना संधी दिली आहे.

31 विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर

पंजाबची विधानसभा निवडणूक 2027 साली होत आहे. त्यासाठी आम आदमी पक्षाने (AAP) 31 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत पक्षाने नव्या चेहऱ्यांना निवडणूक रिंगणात उतरवत असताना जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे, 8 विद्यमान आमदारांचा पत्ता कट केला असून त्यांच्या जागी नव्या उमेदवारांना संधी दिली. दुसऱ्या यादीत पंजाबमधील दोन खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

दोन खासदारांना दिली विधानसभेची उमेदवारी

या यादीत संगरूरचे खासदार गुरमीत सिंह मीत हेयर यांचा समावेश आहे. त्यांना बरनाल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. 'आप'ला 2022 च्या विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता, अशा जागांवरही उमेदवार जाहीर केले आहेत. या दुसऱ्या यादीतील 21 मतदारसंघांमध्ये 2022 मध्ये पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यासोबतच 8 विद्यमान आमदारांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

AAP candidate
Punjab AAP Crisis News: पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘आप’ला धक्का! तीन आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश!

जालंधरमधील तीन उमेदवारांची घोषणा

जालंधरमधील तीन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांसाठीही आम आदमी पार्टीने उमेदवारांची घोषणा केली. जालंधर सेंट्रलमधून नितीन कोहली, जालंधर नॉर्थमधून वनीत धीर, तर जालंधर कँटमधून दीपक बाली यांना उमेदवारी देण्यात आली. आदमपूर विधानसभा मतदारसंघातून पवन कुमार टीनू यांना तिकीट देण्यात आले आहे. तर कपूरथलामधून देविंदर पाल सिंह रंगा आणि फगवाडामधून डॉ. राजकुमार चब्बेवाल निवडणूक लढवणार आहेत.

AAP candidate
AAP MLAs Resign : 'आप'च्या दोन आमदारांचा तडकाफडकी राजीनामा, अरविंद केजरीवालांना धक्का

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.