धामी ठरले 'बाजीगर'! मोदी-शहांच्या उपस्थितीत सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा मान

पुष्करसिंह धामी यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे.
Pushkar Singh Dhami
Pushkar Singh DhamiSarkarnama

डेहराडून : उत्तराखंड (Uttarakhand) राज्यात भाजपने (BJP) सत्ता मिळवली आहे. पुन्हा एकदा पुष्करसिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांच्याच गळ्यात मुख्यमंत्री (Chief Minister) पदाची माळ पडली आहे. पंतप्रंधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. धामी हे खऱ्या अर्थाने 'बाजीगर' ठरले आहेत. कारण विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही ते पुन्हा मुख्यमंत्री बनले आहेत.

धामी यांचा शपथविधी आज डेहराडूनमधील परेड मैदानावर झाला. या वेळी मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह योगी आदित्यनाथ आणि मनोहरलाल खट्टर हे उपस्थित होते. धार्मी हे ४६ वर्षांचे असून, उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनन्ट जनरल (निवृत्त) गुरमितसिंग यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. धामी हे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्यासोबत आठ कॅबिनेट मंत्र्यांचाही आज शपथविधी झाला. यात सत्पाल महाराज, सुबोध उनियाल, धनसिंह रावत, रेखा आर्य आणि गणेश जोशी या आधीच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा समावेश आहे. याचबरोबर रामचरण दास, सौरभ बहुगुणा आणि प्रेमचंद अगरवाल या नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.

Pushkar Singh Dhami
विरोधकांना आणखी एक धक्का! विधानसभा अध्यक्षांकडून पाच आमदारांचे निलंबन

उत्तराखंडमध्ये भाजपने 70 पैकी 47 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केले. परंतु, त्यांचा खातिमा मतदारसंघात पराभव झाला असला तरी ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, माजी केंद्रीय मंत्री रमेश पोखरीयाल निशंक आणि ज्येष्ठ नेते सत्पाल महाराज हे शर्यतीत होते. या चौघांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री निवडीसाठी आमदारांची बैठक पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. केंद्रीय मंत्री राजनाथसिंह आणि पक्षाच्या नेत्या मीनाक्षी लेखी या केंद्रीय निरीक्षक म्हणून बैठकीला हजर होते. या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी धामी यांचे नाव निश्चित करण्यात आले होते.

Pushkar Singh Dhami
आमदारकी धोक्यात येताच मुकुल रॉय यांनी मारली पलटी; भाजपमध्येच असल्याचा दावा

गेल्या वर्षी मार्च महिन्यात उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्रसिंह रावत यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर मुख्यमंत्रिपदी तिरथसिंह रावत आले होते. त्यांना चार महिन्यांतच जुलैमध्ये मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते. नंतर त्याच महिन्यात पुष्करसिंह धामी यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्रिपदासाठी झाली. यानंतर उत्तराखंडमध्ये लगेचच विधानसभा निवडणूक होत असल्याने तोपर्यंत मुख्यमंत्री कोण नेमावा, असा तिढा नेतृत्वासमोर होता. अखेर धामी यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com