AAP News : 850 कोटींच्या साम्राज्यावर ईडीची धाड : दहाव्या दिवशीच खासदार भाजपमध्ये; राजकीय युटर्नमागे तपास यंत्रणांचा ससेमिरा?

Ashok Mittal : राघव चड्ढा यांच्या नेतृत्वाखाली 7 आप खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. यातील अशोक मित्तल यांच्या भूमिकेची विशेष चर्चा सुरू आहे
Ashok Mittal Joins BJP
Ashok Mittal Joins BJPSarkarnama
Published on
Updated on

Ashok Mittal : खासदार राघव चड्ढा यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाच्या 7 खासदारांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. स्वतः चड्ढा यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देत देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. या 7 खासदारांमध्ये अशोक मित्तल यांचेही नाव आहे. आम आदमी पक्षाचे उपनेते असलेल्या मित्तल यांचा भाजप प्रवेश सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

२ एप्रिल रोजी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी राघव चड्ढा यांना राज्यसभेतील 'उपनेते' पदावरून हटवून अशोक मित्तल यांची नियुक्ती केली होती. मात्र, आज राघव चढ्ढा आणि अशोक मित्तल या दोघांनीही एकाच वेळी आम आदमी पक्षाला धक्का दिला.

अशोक कुमार मित्तल उत्तर भारतातील बडे उद्योजक असून, शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. पंजाबमधील नामांकित खाजगी विद्यापीठ 'लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी'चे (LPU) संस्थापक आहेत. त्यांनी २०२२ मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि त्याच वर्षी आम आदमी पक्षाच्या तिकिटावर ते राज्यसभा खासदार बनले.

Ashok Mittal Joins BJP
Raghav Chadha & AAP MPs joining BJP : संविधानातील एका नियमाचा राघव चढ्ढांसह 7 खासदारांना फायदा : खासदारकीचा राजीनामा न देताच सहज भाजपमध्ये

संसदेमध्ये, अशोक मित्तल यांनी संरक्षण आणि वित्त यांसारख्या महत्त्वाच्या समित्यांवर काम केले आहे; तसेच ते 'भारत-अमेरिका संसदीय मैत्री गटा'चेही सदस्य राहिले आहेत. अलीकडेच, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, कनिमोझी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली परदेश दौऱ्यावर गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात त्यांचाही समावेश होता.

उपनेतेपदी नियुक्तीनंतर 'ईडी'चे छापे

१५ एप्रिल रोजी, ईडीने अशोक मित्तल यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकले होती. जवळपास 850 कोटी रुपयांचे साम्राज्य असलेल्या मित्तल यांच्या गुरुग्रामसह, जालंधर आणि फगवाडा येथील 'लव्हली ग्रुप'शी संबंधित संस्था, मित्तल आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित निवासस्थाने व इतर व्यावसायिक कार्यालयांवर छापे टाकले होते.

Ashok Mittal Joins BJP
Raghav Chadha revolt : ‘आप’मध्ये सर्वात मोठी फूट; अखेर राघव चड्ढा यांचे केजरीवालांना हादरवणारे बंड, सात खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

Raghav'परकीय चलन व्यवस्थापन कायद्या'अंतर्गत (FEMA) ही कारवाई केल्याचे ईडीने स्पष्ट केले होते. आता याच मित्तल यांनी अवघ्या 10 दिवसांत भाजपमध्ये प्रवेश केल्याने दबक्या आवाजात या कारवाईमुळेच त्यांनी राजकीय भूमिका बदलल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com