BJP leadership changes : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडताच भाजपने देशातील चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. पुढीलवर्षी निवडणूक होणार असलेल्या पंजाबसह दिल्ली, हरियाणा आणि त्रिपुरामध्ये नेतृत्वात बदल करण्यात आला आहे. भाजपने पंजाबमध्ये केलेल्या बदलाने अनेकांना धक्का बसला आहे.
काही दिवसांपूर्वीच सत्ताधारी आम आदमी पक्षाचे पंजाबमधील खासदार राघव चड्ढा यांच्यासह सात खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने राघव चड्ढा यांच्यावर पंजाबमध्ये मोठी जबाबदारी टाकली जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष बदलामध्ये त्यांना स्थान देण्यात आलेले नाही.
राघव चड्ढा आणि त्यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केलेल खासदार संदीप पाठक यांनी राज्यात आपचे सरकार आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. राज्यात आपची ताकद वाढविण्यासह संघटन मजबूत करणे आणि निवडणुकीची रणनीती आखण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे प्रामुख्याने चड्ढा यांच्याकडे राज्याचे नेतृत्व दिले जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र, भाजपने त्यांना संधी दिली नाही.
पंजाबमध्ये माजी आमदार केवल सिंह ढिल्लों यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे. ते बरनाला मतदारसंघाचे दोनदा आमदार होते. विकासकामांमध्ये कोणताही समझोता न करणारा नेता म्हणून राज्यात त्यांची ओळख आहे. ते मुळचे काँग्रेसमधील आहेत. दरम्यान, भाजपने दिल्लीत खासदार हर्ष मल्होत्रा यांच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे.
हरियाणामध्ये डॉ. अर्चना गुप्ता या महिला नेत्याला जबाबदारी देण्यात आली असून त्यांची संघटनेवर मजबूत पकड आहे. राज्यात त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्रिपुराची जबाबदारी अभिषेक देबरॉय यांच्याकडे देण्यात आली आहे. त्रिपुरा भाजपमध्ये ते अनेक वर्षांपासून सक्रीय आहेत. प्रामुख्याने संघटना अधिक मजूबत करण्यावरच त्यांचा भर राहिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.