Rahul Gandhi News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत राहुल गांधींचा अमेरिकेतून गंभीर आरोप, म्हणाले, 'पहाटे तीनपर्यंत...'

Rahul Gandhi On Maharashtra Election : राहुल गांधी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत तेथे त्यांनी ब्राऊन विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप लावले.
Rahul Gandhi speaks in the U.S., raises concerns over alleged discrepancies in Maharashtra Assembly elections.
Rahul Gandhi speaks in the U.S., raises concerns over alleged discrepancies in Maharashtra Assembly elections.sarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi News : काँग्रेस नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी बोस्टनमधील ब्राऊन विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या संवादामध्ये त्यांनी भारतीय निवडणुकीमध्ये गडबड असल्याचे भाष्य केले. यासाठी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा संदर्भ दिला.

राहुल गांधी म्हणाले, 'महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तरुणांने मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे दिसून आले. निवडणूक आयोगाने आम्हाला संध्याकाळपर्यंतची आकडेवारी दिली. पात्र साडेपाच ते साडेसात यावेळेत तब्बल 65 लाख मतदान झाल्याची आकडेवारी आली, असं होणं केवळ अशक्य आहे.'

Rahul Gandhi speaks in the U.S., raises concerns over alleged discrepancies in Maharashtra Assembly elections.
Mahayuti Politics: महायुतीमध्ये बिघाडीचे संकेत; माजी मंत्र्यांनं स्पष्टच सांगून टाकलं...; स्थानिक निवडणुका स्वबळावरच लढणार

'केवळ दोन तासांत 65 लाख मतदान हे अशक्यच आहे.कारण एका मतदाराला मतदान करण्यासाठी साधारण तीन मिनिटांचा वेळ लागतो. येवढे सगळ्यांनी मतदान केले असते तर पहाटे तीनपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालली असती आणि मतदान करायला चार वाजले असते.', असे देखील राहुल गांधी यांनी म्हटले.

निवडणूक आयोगावर आक्षेप

राहुल गांधी म्हणाले, पहाटेपर्यंत कुठेही मतदान झालेले पाहण्यास मिळाले नाही. आम्ही निवडणूक केंद्रावरील मतदानाचे व्हिडिओ देण्याची विनंती केली होती तसा अर्जही केला होता. मात्र व्हिडिओ आम्हाला देण्यात आले नाही. आता थेट कायदा करुन मतदान केंद्रावरील व्हिडिओ उपलब्ध करून दिले जाणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे स्पष्ट आहे की निवडणूक आयोगाने तडजोड केली. निवडणूक प्रक्रियेत गंभीर घोळ आहेत, असा आरोपही राहुल यांनी केला.

महाराष्ट्र विधानसभेत महायुतीला बहुमत

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपला 132, शिवसेना 57 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसला अवघ्या 16, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 20 जागा मिळाल्या.

Rahul Gandhi speaks in the U.S., raises concerns over alleged discrepancies in Maharashtra Assembly elections.
Ahilyanagar Karjat Nagar Panchayat : नगराध्यक्षांना हटविण्याचा 'तो' अध्यादेश; शिंदे अन् पवारांच्या मतदारसंघात आज पहिला निर्णय होणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com