Modi viral moment : PM मोदी अन् मेलोनी यांच्यातील 'मेलोडी' तुफान व्हायरल; खास गिफ्ट देतानाचा व्हिडिओ आला समोर...

PM Modi Melody toffee gift, Giorgia Meloni viral video : PM मेलोनी आणि पंतपधान मोदी यांची यापूर्वीही अनेकदा भेट झाली आहे. या नेत्यांनी भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केले आहेत.
PM Modi Meloni trending news
PM Modi Meloni trending newsSarkarnama
Published on
Updated on

PM Modi Europe visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर असून अखेरच्या टप्प्यात ते इटलीमध्ये दाखल झाले आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी 'माय फ्रेंड' म्हणत पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. मेलोनी यांनी PM मोदींना रोममधीलल प्रसिध्द स्थळांची सफर घडविली, एकत्रित जेवण केले. या भेटीचे फोटो खुद्द मोदींनी सोशल मीडियात पोस्ट केले आहे. त्यानंतर आता मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना त्यांना दिलेल्या खास गिफ्टचा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे.

मेलोनी यांनी शेअर केलेला व्हिडिओ काही मिनिटांतच तुफान व्हायरल झाला असून त्यावर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. पंतप्रधान मोदी मेलोनी यांना मेलोडी टॉफी गिफ्ट देतानाचा हा व्हिडीओ आहे. या गिफ्टसाठी मेलोनी यांनी त्यांचे आभारही मानले. खास गिफ्ट घेतानाचा हा क्षण खुद्द मेलोनी यांनीच मोबाईलमध्ये टिपला आहे. टॉफी घेतल्यानंतर मेलोनी खूप आनंदित झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.

पंतप्रधान मोदी आणि मेलोनी हे नेहमीच एकमेकांचा उल्लेख करताना माय फ्रेंड असे आवर्जून लिहितात. त्यांच्या या मैत्रीसाठी सोशल मीडियात 'मेलोडी' हा शब्द वापरला जातो. आज पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियातील हाच ट्रेंड फॉलो करत मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट गिफ्ट केले. मेलोनी यांनी हा क्षण मोबाईलमध्ये कैद करत अविस्मरणीय केला. त्यामुळे या व्हिडिओची सोशल मीडियात प्रचंड चर्चा होत आहे.

PM Modi Meloni trending news
थेट मुख्यमंत्र्यांना भिडणारी 'वाघीण', महिला IPS अधिकारी पुन्हा मैदानात; जुनी प्रकरणं उकरून काढणार...

दरम्यान, इटलीमध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मेलोनी यांच्यासोबतच फोटो सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, रोममध्ये पोहोचल्यानंतर मी पंतप्रधान मेलोनी यांना रात्रीच्या जेवणादरम्यान भेटलो. त्यानंतर आम्ही प्रसिध्द कोलोसियमला भेट दिली. आम्ही विविध विषयांवर एकमेकांसमोर विचार मांडले. भारत आणि इटलीतील मैत्रीचे संबंध अधिक दृढ होण्यासाठी आमच्यातील चर्चा अशीच सुरू राहील, असेही मोदींनी म्हटले आहे.

PM Modi Meloni trending news
Congress News : भाजपने आणखी एका राज्यात काँग्रेसला दिला झटका; सत्ता असूनही ओढविली नामुष्की

मेलोनी आणि पंतपधान मोदी यांची यापूर्वीही अनेकदा भेट झाली आहे. या नेत्यांनी भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केले आहेत. मागील तीन वर्षांत दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास आठवेळा विविध ठिकाणी भेटी झाल्या आहेत. २०२३ मध्ये मेलोनी या भारतात आल्या होत्या. भारत आणि इटली या दोन्ही देशांतील संबंध अधिक मजबूत व्हावेत, यासाठी हे दोन्ही नेते प्रयत्नशील आहेत. विविध क्षेत्रांत दोन्ही देशांमध्ये अनेक करार झाले असून एकमेकांना सहकार्य आणि भागीदारीच्या माध्यमातून त्याला बळकटी येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com