Rahul Gandhi Challenge PM Modi : दिल्लीत पोलिसांकडून धरपकड, राहुल गांधी मैदानात, खुले चॅलेंज देत म्हणाले,...

Rahul Gandhi PM Modi Amit Shaha : राहुल गांधी म्हणाले, 'गेल्या दशकाहून अधिक काळापासून मी नरेंद्र मोदी आणि आरएसएसविरोधात लढत आहे. त्यांना मी ओळखतो ते भित्रे आहेत.
Rahul Gandhi, PM Narendra Modi
Rahul Gandhi, PM Narendra ModiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Rahul Gandhi News : सीजेपीच्या आंदोलनाच्या आधीच पोलिसांनी नेत्यांची धरपकड सुरू केली होती. आपचे अरविंद केजरीवाल यांच्यासह पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना देखील ताब्यात घेण्यात आले होते. आज सीजेपीच्या नेत्यांना सोडण्यात आले आहे. दरम्यान, पोलिस नेत्यांची धरपकड करत होते तेव्हा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले आव्हान दिले.

राहुल गांधी म्हणाले, 'गेल्या दशकाहून अधिक काळापासून मी नरेंद्र मोदी आणि आरएसएसविरोधात लढत आहे. एखाद्या प्रतिस्पर्ध्याला आपण जसं आतून-बाहेरून ओळखतो, त्याचप्रमाणे मी त्यांना ओळखतो. त्यांच्या प्रत्येक डावपेचांची मला पूर्ण जाणीव आहे.या लोकांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यातील भित्रेपणा.'

'नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, ज्ञानेश कुमार आणि अजित डोवाल हे या कथेतले खलनायक आहेत. आता त्यांच्याभोवतीचा कोंडमारा हळूहळू वाढत आहे. आणि हा कोंडमारा आम्ही वाढवत आहोत.मोदीजी, तुम्हाला जे करायचं आहे ते करा. १० हजार, २० हजार, ५० हजार किंवा त्याहून अधिक पोलीस बोलवा. तुम्हाला हवी तेवढी पोलीस फौज तैनात करा.

सर्व नेत्यांना अटक करा. सर्व तरुणांना अटक करा. आम्हा सर्वांनाच अटक करा.', असे खुले चॅलेंज त्यांनी दिले.

आंदोलन सुरू ठेवा...

'आम्ही तुम्हाला घेरत आहोत आणि आता मागे हटणार नाही. माझे शब्द लक्षात ठेवा, आम्हाला आवश्यक असलेली माहिती आधीच मिळाली आहे. आम्ही आपल्या संविधानाचं रक्षण करणार आहोत. भारतातील जनतेचा आवाज सुरक्षित ठेवणार आहोत. आणि गेल्या १० ते १५ वर्षांत भारतासोबत जे काही घडवण्यात आलं, त्याची पुनरावृत्ती पुन्हा कधीही होऊ देणार नाही.भारताच्या तरुणांनो, मला तुमचा अभिमान आहे. तुमचं आंदोलन सुरू ठेवा. आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.'

Rahul Gandhi, PM Narendra Modi
CJP Leaders Released : दिपके, रांका, दास यांची सुटका होताच सीजेपीने दिल्ली पोलिसांना डिवचलं; म्हणाले, "झुरळं कधीच..."

महिलांशी गैरवर्तन

आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांशी आंदोलनाला विरोध करणाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यावरून राहुल गांधींनी गृहमंत्री अमित शाहांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, अमित शाहांची दिल्ली पोलिस गुंडागर्दी करत आहेच. सोबत आरएसएस आणि भाजपचे खरे गुंड देखील महिलांवर हल्ले करत आहे.

Rahul Gandhi, PM Narendra Modi
Rahul Gandhi News: काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय, सर्व आमदार-खासदारांना तातडीनं दिल्लीत हजर राहण्याचे आदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com