New Delhi : लोकसभेत संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरुन जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चासत्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये लोकसभेत खटके उडताना दिसून येत आहे. याचदरम्यान, संसदेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) ऑपरेशन सिंदूरवरील चर्चासत्रात तडाखेबंद भाषण केलं.
खासदार राहुल गांधी मंगळवारी (ता.29) संसदेत आक्रमक भाषण केलं. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. ऑपरेशन सिंदूर हे फक्त 22 मिनिटं चाललं. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह काल त्यांच्या भाषणात म्हणाले, आम्ही 1.45 वाजता पाकिस्तानला फोन करुन सांगितलं,आम्ही लष्करी तळांवर हल्ला करणार नाही,मोदी सरकारनं पाकिस्तानसमोर 30 मिनिटांतच सरेंडर केले.
भारतानं पाकिस्तानला (Paksitan) आपला प्लॅन सांगितला. त्यामुळे सरकारच्या चुकीच्या रणनीतीमुळे आपण आपली लढाऊ विमानं गमावली. तुम्ही आपल्या वैमानिकांचे हात बांधले. लष्करी तळांवर हल्ले करु नको हे सांगून सरकारनं वैमानिकांच्या अडचणी वाढवल्याचा हल्लाबोलही त्यांनी केलं.
लष्करी तळांवर हल्ला करणार नाही हे आपण पाकिस्तानला का सांगितलं? अशी विचारणाही राहुल गांधी यांनी केली. भारतीय वायुसेनेला आपण दोष देऊ शकत नाही. हिंमत असेल तर सभागृहात पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना तुम्ही खोटारडं म्हणा असं आव्हानही त्यांनी केलं.
राहुल गांधी यांंनी लोकसभेतील आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पहलगाममध्ये झालेला निर्घृण हल्ला पाकिस्ताननेच केल्याचं स्पष्ट केला. तसेच त्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर सर्वपक्ष सरकार आणि भारतीय सैन्यादलाच्या पाठीशी उभे होते. पण अचानकपणे ऑपरेशन सिंदूर सुरू असताना डीजीएमओंना लष्करी कारवाईमध्ये वाढ न करण्याचे निर्देश दिल्याचा दावाही केला आहे.
या चर्चेदरम्यान, राहुल गांधी यांनी पहलगाम हल्ल्यात महिलांसमोर त्यांच्या पतीला आणि कुटुंबियांना मारण्यात आलं. त्यांच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर आता पहलगाम हल्ल्यातील घटनेबाबत ऐकलं तरी खूप दु:ख होतं. जी घटना झाली ती चुकीची होती,असंही त्यांनी म्हटलं.
राहुल गांधी म्हणाले, राजकारणात काम करत असताना जेव्हा जनतेत जातो. तेव्हा काही जवानांना भेटत असतो. त्यांचा हात हातात घेतला तरी समजतं की, हे भारतीय जवान आहेत. खरं तर भारतीय सैन्य म्हणजे वाघ असून त्या वाघाला ऑपरेशन सिंदूरवेळी पूर्ण स्वातंत्र्य द्यायला हवं होतं. काहीवेळा आपल्या वाघांना स्वातंत्र्य द्यायला हवं, असंही त्यांनी सांगितलं.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी मे महिन्यात पूँछच्या दौर्यादरम्यान तेथील काँग्रेस नेत्यांना हल्ल्यातील पीडित मुलांसंबंधीची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले होते. यावर आता आपलं कुटुंब गमावेल्या पूँछमधील 22 मुलांना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जम्मू आणि काश्मीर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कर्रा यांनी माहिती दिली. आहे. राहुल गांधी या मुलांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.