Rahul Gandhi News : महाराष्ट्रातील आणखी एका बड्या मंत्र्याची खुर्ची डळमळीत : राजीनाम्यासाठी थेट राहुल गांधींनीच लावली ताकद

Maharashtra tribal students protest News : आदिवासी विद्यार्थ्यांकडून आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील असुविधांविरोधात आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांची नाशिकमध्ये भेट घेतली.
Rahul Gandhi message to Congress workers
Rahul Gandhi Congress meeting NashikSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : टीईटी पेपरफुटी आणि महाराष्ट्रातील दुरावस्थेमुळे आधीच शिक्षणमंत्री दादा भुसे यांची खुर्ची धोक्यात आली आहे. विरोधक आणि कॉक्रोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्याकडून सातत्याने भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशात आता काँग्रेसचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा राजीनामा घेण्यासाठी ताकद लावली आहे.

13 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन

आदिवासी विद्यार्थ्यांकडून आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील असुविधांविरोधात आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांची नाशिकमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांच्या विविध समस्या राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या. सुमारे अर्धा तास झालेल्या चर्चेत वसतिगृहातील सुविधा, पोषण आहार आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह अनेक प्रश्नांवर चर्चा झाली.

‘590 विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी करा’

गेल्या दोन वर्षांत राज्यातील वसतिगृहांमध्ये 590 विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. या मृत्यूंची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची मागणीही राहुल गांधी यांच्याकडे करण्यात आली.

Rahul Gandhi message to Congress workers
Rahul Gandhi Politics : राहुल गांधींचे आदिवासी कार्ड, आंदोलकांमध्ये जोश भरुन CM फडणवीसांवर आणणार दबाव?

विद्यार्थ्यांनी थेट मागितला उईकेंचा राजीनामा

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतील त्रुटी आणि आश्रमशाळांमधील संशयास्पद मृत्यूंची नैतिक जबाबदारी स्वीकारून आदिवासी विकासमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. याच मागणीवर ‘तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पूर्ण बळ देऊ. संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी सरकारला भाग पाडू,’ अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली.

Rahul Gandhi message to Congress workers
Maharashtra Live Update: राहुल गांधी आंदोलनकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी मांजरी येथे जाण्याची शक्यता

सेंट्रल किचनला विरोध

आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारासाठीची सेंट्रल किचन पद्धत बंद करून स्थानिक पातळीवर पोषण आहार उपलब्ध करून द्यावा, अशीही प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी केली. स्थानिक पातळीवर दर्जेदार आणि पौष्टिक आहार मिळावा, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली.

राहुल गांधी म्हणाले, ‘मागण्या रास्त’

विद्यार्थी वसतिगृहातील असुविधांबाबत प्रश्न मांडत असून त्यांच्या मागण्या रास्त आहेत. या प्रश्नांवर राज्यस्तरावर लढा उभारण्याची गरज असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात राज्य काँग्रेस कार्यकारिणीकडे निवेदन देण्याची सूचनाही त्यांनी केली.

Rahul Gandhi message to Congress workers
Rahul Gandhi: राहुल गांधी पुन्हा पुण्यात येणार! 'छात्रों की गुंज' कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थीनीला दिलेला शब्द पळणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com