Rahul Gandhi Reel Controversy : राहुल गांधी अन् CM विजय यांच्या 'त्या' रीलला ब्लॉक करणाऱ्या 'मेटा'ची पलटी; केंद्र सरकारकडून हात वर

Rahul Gandhi and CM Vijay reel controversy: काँग्रेस नेते राहुल गांधी हे काल विजय यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी चेन्नई येथे गेले होते. शपथविधी सोहळ्यादरम्यान विजय आणि राहुल गांधी यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते.
Rahul Gandhi and Joseph Vijay during the Chennai swearing-in event. The Instagram controversy over blocked reels and photo posts has intensified the political debate online
Rahul Gandhi and Joseph Vijay during the Chennai swearing-in event. The Instagram controversy over blocked reels and photo posts has intensified the political debate onlineSarkarnama
Published on
Updated on

CM Vijay social media reel controversy: राहुल गांधी आणि नुकतेच तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले जोसेफ विजय यांच्या एकत्रित उपस्थितीतील ‘रील’ आणि फोटो पोस्ट इन्स्टाग्रामने ब्लॉक केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. या घटनेनंतर राजधानी दिल्लीतील राजकारण चांगलेच तापले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी हे काल विजय यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी चेन्नई येथे गेले होते. शपथविधी सोहळ्यादरम्यान विजय आणि राहुल गांधी यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. या पोस्टना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या नियमांचा दाखला देत त्या ब्लॉक करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे श्रीवत्स यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट करत दावा केला की, विजय आणि राहुल गांधी यांच्या ‘रील’ला एका तासापेक्षाही कमी वेळात १ कोटी २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. तर फोटो पोस्ट जवळपास ४ कोटी ६० लाख लोकांपर्यंत पोहोचली होती.

मात्र, पोस्ट ब्लॉक करताना मेटाकडून कोणतेही ठोस कारण देण्यात आले नाही. केवळ IT नियमांचा दाखला देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेसने यापूर्वीही राहुल गांधी यांच्या सोशल मीडिया पोस्ट्सचा पोहोच मर्यादित केला जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच, त्यांच्या YouTube व्ह्यूज आणि फॉलोअर्सनाही टार्गेट केलं जात असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

दरम्यान, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इन्स्टाग्रामच्या अंतर्गत ऑटोमेटेड सिस्टीममधील तांत्रिक त्रुटीमुळे या पोस्ट्स काही काळासाठी ब्लॉक झाल्या होत्या. ही चूक आता दुरुस्त करण्यात आल्याचंही मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

Rahul Gandhi and Joseph Vijay during the Chennai swearing-in event. The Instagram controversy over blocked reels and photo posts has intensified the political debate online
Rupali Chakankar : "होय मी खरात आणि त्याच्या पत्नीला गुरू मानलं होतं..."; SIT चौकशीत चाकणकरांची कबुली, नेमकं काय म्हणाल्या?

तसेच, विरोधी पक्षनेत्याचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न होत नसल्याचा दावाही मंत्रालयाने केला आहे. काँग्रेस मात्र या घटनेकडे लोकशाहीतील विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणून पाहत आहे, तर सरकार याला केवळ ‘तांत्रिक बिघाड’ असल्याचं सांगत आहे.

Rahul Gandhi and Joseph Vijay during the Chennai swearing-in event. The Instagram controversy over blocked reels and photo posts has intensified the political debate online
Narendra Modi appeal impact : PM मोदींच्या आवाहनाचे काही तासांतच पडसाद; शेअर बाजाराने दाखविला रेड सिग्नल...

दरम्यान, विजय आणि राहुल गांधी यांच्या ज्या पोस्ट्सवरून राजकीय वातावरण तापलं होतं, त्या आता पुन्हा अनब्लॉक करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता मेटाने आधी ब्लॉक आणि आता अनब्लॉक करत पलटी मारल्याचं दिसत आगे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावरून सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र अद्यापही सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com