Rahul Gandhi : मेलोनी समजून तर पकडलं नाही ना? काँग्रेस नेत्याकडून राहुल गांधींसमोरच थेट PM मोदी-मेलोनी भेटीची खिल्ली, वाद पेटला

Rahul Gandhi on PM Modi Foreign Policy Row : राहुल गांधी व्यासपीठावरून संदीप दीक्षित यांच्या दिशेने गेले आणि त्यांची गळाभेट घेतली. त्यानंतर, पंतप्रधान मोदी परदेशात गेल्यानंतर विविध देशांच्या नेत्यांची गळाभेट घेतात आणि त्यांनाच परराष्ट्र धोरण वाटते, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.
Rahul Gandhi on Modi Meloni meeting
Rahul Gandhi Mocks Modi | Foreign Policy RowSarkarnama
Published on
Updated on

Navi Delhi News, 14 Aug : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावरून जोरदार टोलेबाजी केली आहे. परदेशात गेल्यावर तिथल्या राष्ट्रप्रमुखांची गळाभेट घेणे म्हणजे परराष्ट्र धोरण नव्हे, असा टोला गांधी यांनी मोदींना लगावला आहे.

इतकंच नव्हे तर राहुल यांनी थेट व्यासपीठावरच काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांची गळाभेट घेत मोदींची मिमिक्री केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल गांधी यांनी १३ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विविध मुद्द्यांवरून निशाणा साधला.

यावेळी त्यांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना परदेशी नेत्यांशी होणाऱ्या त्यांच्या गळाभेटींचा उल्लेख केला. मोदींचे परराष्ट्र धोरण नेमके कसे आहे, हे दाखवून देत असल्याचे सांगत राहुल गांधी व्यासपीठावरून संदीप दीक्षित यांच्या दिशेने गेले आणि त्यांची गळाभेट घेतली. त्यानंतर, पंतप्रधान मोदी परदेशात गेल्यानंतर विविध देशांच्या नेत्यांची गळाभेट घेतात आणि त्यांनाच परराष्ट्र धोरण वाटते, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

Rahul Gandhi on Modi Meloni meeting
Packaged Food: सिगारेट-तंबाखूप्रमाणं आता 'पॅकेज्ड फूड'वर धोक्याचा इशारा देणं बंधनकारक; सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला आदेश

राहुल गांधी यांच्या या कृतीनंतर संदीप दीक्षित राहुल गांधींना म्हणाले, "एक गोष्ट विचारू का?, मेलोनी समजून तर पकडलं नाही ना?ठ संदीप दीक्षित यांचा हा टोला इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेकदा झालेल्या भेटींवर होता. यावर राहुल गांधी हसत म्हणाले, "नाही-नाही, मी अजून तिथपर्यंत पोहोचलो नाही."

या संपूर्ण प्रसंगामुळे कार्यक्रमात हशा पिकला. मात्र, या व्हिडिओवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. भाजपकडून राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर सडकून टीका करण्यात आली असून, काँग्रेसने मात्र राहुल गांधींच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

Rahul Gandhi on Modi Meloni meeting
Harbhajan Singh: 'आप'ची खासदारकी न सोडता 'भाजप'त का गेला हरभजन सिंग; मुलाखतीत दिलं खळबळजनक उत्तर

दरम्यान, "जोपर्यंत नरेंद्र मोदी राजीनामा देत नाहीत आणि अमित शाह पद सोडत नाहीत, तोपर्यंत त्या दोघांनाही आम्ही शांत झोपू देणार नाहीत," असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला. हा लढा द्वेष किंवा हिंसेचा नसून देशातील प्रेम, बंधुभाव आणि अहिंसेची मूल्ये जपण्यासाठी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com