

Rahul Gandhi News : विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी हे अमेरिकेच्या दौऱ्यात शिकागो विद्यापीठात विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधला. पाकिस्तानी विद्यार्थ्याने राहुल यांना भारत आणि पाकिस्तामध्ये संवादाची शक्य आहे का? असा प्रश्न केला.
त्यावर राहुल गांधी यांनी उत्तर दिले की, हो संवादाची शक्यता आहे. मात्र, पहिल्यांदा पाकिस्तानाला आंतकवादाला समर्थन देणे बंद करावे लागेल. आमच्या निष्पाप नागरिकांचे बळी जात असताना पाकिस्तानशी चर्चा करणे अशक्य आहे. दहशतवादाचे हे प्रकार थांबण्यावरच चर्चा शक्य आहे.
राहुल गांधींनी या संवादमध्ये जागतीक राजकारणात भारताची सध्याची स्थिती यावर देखील भाष्य केले. जागतिक राजकारणात भारताचे स्थान महत्त्वाचे आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत भारत हा साइड प्लेअर बनला आहे, असे म्हटले. त्यांनी या गोष्टीवर देखील आश्चर्य व्यक्त केले की, पाकिस्तानने इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी मध्यस्थाची भूमिका पार पडली. आणि भारताने फक्त बघ्याची भूमिका घेतली.
स्वातंत्र्यापासून भारताला जागतिक राजकारणाची सखोज जाण होती. स्वतःचा एक दृष्टिकोण होता. स्वतःचे एक मत होते. मात्र, ते मत आता सध्या हरवले आहे. जागतिक मंचावरून तो मागे हटत असल्याचे त्यांनी सांगितले.
आशिया-पॅसिफिक इकाॅनाॅमिक कोऑपरेशनच्या शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे ब्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग एकत्र आले आहे. हे तिन्ही नेते एका टेबलावर बसलेला फोटो राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाव न घेता टोला लगावला. ते म्हणाले, जर काँग्रेस सत्तेत असती तर भारताचा पंतप्रधान या टेबलावर बसलेला असता. काॅम्प्रमाईज पंतप्रधान या टेबलावर कधीच बसू शकत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.