Rahul Gandhi Vs Amit Shah : अमित शाहंसोबत घेतलेला पंगा राहुल गांधींना भोवणार? खासदारकीवरच घाव घालण्याची तयारी!

Rahul Gandhi Faces Privilege Notice : राहुल गांधी यांनी लोकसभेत थेट अमित शाहांचे नाव घेत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर भाजप अ‍ॅक्शन मोडवर आली असून कारवाईसाठी थेट लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेतली आहे.
Rahul Gandhi, Amit shah
Rahul Gandhi, Amit shahSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले. थेट शाह यांचे नाव घेत त्यांनी विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश दिल्याचे म्हटले. त्यांच्या या आरोपानंतर सत्ताधारी भाजप खासदार आक्रमक झाले होते. सभागृहाचे कामकाज देखील स्थगित करण्यात आले होते. आता राहुल गांधींना घेरण्यासाठी भाजपने मोठे पाऊल उचलले आहे.

भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लांकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात हक्कभंग आणि सभागृहाचा अवमान केल्याची नोटीस दाखल केली आहे.

गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल असंसदीय आणि अपमानास्पद भाषेचा वापर केल्याचा; तसेच गंभीर आणि निराधार आरोप केल्याचा दावा ठाकूर यांनी या नोटिशीत केला आहे.

या नोटिशीत ठाकूर यांनी बिर्ला यांना विनंती केली आहे की, हे प्रकरण सखोल चौकशीसाठी हक्कभंग समितीकडे पाठवावे व गांधी यांना सभागृहासह अमित शहा यांची बिनशर्त माफी मागण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

Rahul Gandhi, Amit shah
Parliament debate : राहुल गांधींनी स्वत:लाच सापळ्यात अडकविले..! थेट अमित शहांना भिडल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांचा पारा चढला

'त्या' शब्दांवरही आक्षेप

२९ जुलै रोजी पेपरफुटीविरोधी विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी झालेल्या कथित संभाषणाचा उल्लेख करताना 'नियम ३५२'चे उल्लंघन केल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे. सभागृहात बोलताना गांधी यांनी नागरिकांचे 'विद्यार्थी', 'इडियट' आणि 'अंधभक्त' अशा तीन वर्गात वर्गीकरण केले. संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांच्या विधानावर आक्षेप नोंदवून हे शब्द कामकाजातून काढून टाकण्याची मागणीही केली होती.

Rahul Gandhi, Amit shah
Rahul Gandhi : अंधभक्त, मूर्ख अन् अमित शाह..., राहुल गांधीचे 'ते' शब्द अन् लोकसभेत गदारोळ; कामकाज स्थगित

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com