

Rahul Gandhi: काँग्रेस पक्षावर कायमच घराणेशाहीचा आरोप होत आला आहे. गांधी-नेहरु कुटुंबाचे वारस म्हणून राहुल अन् प्रियांका गांधीच नव्हे तर काँग्रेसमधील इतर नेत्यांची मुलंही महत्वाच्या पदावर नियुक्त केले जात असल्यानं हा आरोप होत होता. पण आता राहुल गांधीनी काँग्रेस अंतर्गत हीच राजकीय घराणेशाही संपवण्यासाठी एक मास्टरस्ट्रोक खेळला आहे.
दिल्लीतील ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी चक्क सचिव पदासाठी मुलाखती घेतल्या. त्यानंतर या पदासाठी जो योग्य उमेदवार वाटेल त्यालाच त्या पदावर नियुक्त करण्यात येणार आहे. केवळ एखाद्या नेत्याला किंवा त्यांच्या मुलाला-मुलीचं राजकारणातील पुनर्वसन करायचं म्हणून आता संघटनात्मक पदं वाटली जाणार नाहीत. यामध्ये दिल्ली, युपी, राजस्थान इथल्या शिफारसींचा जुना फॉर्मयुला बदलत आता थेट धडाडीच्या नेतृत्वाला प्राधान्य देण्यात येणार आहे.
जुन्या नेतृत्वाऐवजी, जमिनीवर उतरुन आक्रमकपणे लढा देणाऱ्या कार्यकर्त्यालाच आता संघटनेमध्ये पदं दिली जाणार आहेत. भारत जोडो यात्रेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, ओबीसी तसंच खुल्या प्रवर्गातील तरुणांना संघटनेत संधी दिली जाणार आहे. हा काँग्रेसमध्ये सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न आहे. नेते, पाधिकारी आणि मंत्र्यांच्या मुलांऐवजी स्थानिक पातळीवरील पकड आणि पक्षासाठी केलेल्या कामाला महत्व दिलं जात आहे, असं काँग्रेसनं सांगितलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत राहुल गांधींच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ झालेली दिसते, यामध्ये त्यांची देहबोली, राजकारण करण्यासारखे विषय टाळून अत्यंत जमिनीवरचे प्रश्न घेऊन ते रस्त्यावर उतरत आहेत. त्याचबरोबर जेनझी सारख्या तरुणांना आपलंस वाटावं यासाठी त्यांच्याशी इंग्रजी भाषेतच ते संवाद साधताना दिसत आहेत. तरुण मुलींना देखील त्यांनी पितृसत्ताक व्यवस्थेला झुगारुन देण्याचं आवाहन केल आहे. राहुल गांधी आपल्याच भाषेत आणि स्टाईलमध्ये राहत असल्यानं ही तरुणाई त्यांच्या जवळ जाताना दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.